पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज त्यांच्या 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या 88 व्या भागाद्वारे देशातील जनतेला संबोधित केले आहे. पीएम मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात. आज देशातील जनतेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून भीम यूपीआय झपाट्याने आपल्या अर्थव्यवस्थेचा आणि सवयीचा भागच बनला आहे. यावेळी ते म्हणाले की, आता छोट्या शहरांमध्ये आणि बहुतेक गावांमध्येही लोक UPI वरूनच लेन घेत आहेत. आज झालेल्या PM मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमातील 10 मोठ्या गोष्टींवर एक नजर टाकूया. (Mann Ki Baat Digital transactions become part of economy Prime Minister Narendra Modi)
मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाला 'पंतप्रधान संग्रहालय' मिळाले आहे, जे देशातील लोकांसाठी खुले करण्यात आले. पंतप्रधानांच्या योगदानाचे स्मरण करून देशातील तरुणांना त्यांच्याशी जोडत आहोत, ही अभिमानाचीच एक बाब आहे.
पीएम मोदी म्हणाले की लोक अनेक वस्तू संग्रहालयांना दान करत आहेत आणि भारताच्या सांस्कृतिक वारशात खारीचा वाटा देत आहेत. कोविड महामारीच्या काळात, संग्रहालयांच्या डिजिटायझेशनवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहेत. येत्या सुट्ट्यांमध्ये तरुणांनी आपल्या मित्रांसह संग्रहालयाला भेट द्यायलाच हवी असंही मोदी यावेळी म्हणाले.
डिजिटल अर्थव्यवस्थेमुळे देशात एक संस्कृती जन्माला येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत. रस्त्याच्या कोपऱ्यातील छोट्या दुकानांमध्ये डिजिटल पेमेंट आल्याने त्यांच्यासाठी अधिकाधिक ग्राहकांना सेवा देणे सोपे झाले, आणि आता त्यांना खुल्या पैशाचीही अडचण नाहीये.
'मन की बात'मध्ये पीएम मोदी म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभदिनी पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पीएम म्युझियमबाबत सर्वाधिक पत्रे सर्व ठिकाणांवरून आली आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश आजकाल दिव्यांगांसाठी संसाधने आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सतत धडपडत आहे. दिव्यांग कलाकारांचे काम जगासमोर नेण्यासाठी एक अभिनव सुरुवातही करण्यात आली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा एक संकल्प आहे ज्याने देश पुढे जातो आहे. देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बांधले जाणार आहेत. पीएम मोदी म्हणाले की, तंत्रज्ञानाने आणखी एक मोठे काम केले, आपल्या अपंग साथीदारांच्या असामान्य क्षमतेचा देश आणि जगाला फायदा करून देण्याचेच हे कार्य आहे. आपले अपंग बांधव काय करू शकतात हे आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाहिलेच आहे.
पीएम मोदी म्हणाले की, 18 मे रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्यात येणार आहे. पीएम मोदी म्हणाले की, तुम्ही कल्पना करू शकता का, की आज दिवसभर शहरात फिरेल आणि एक रुपयाची लेन करणार नाही, असा संकल्प घेऊन कोणी घरातून बाहेर पडावे. हे सर्व आज डिजिटल पेमेंटमुळे शक्य झाले आहे, त्यामुळे तुम्हाला पैसे काढण्याची गरज आता नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.