Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

'पूर्वाचंल एक्सप्रेस वे उत्तरप्रदेशची शान'

उत्तरप्रदेशचा (Uttar Pradesh) सर्वांगीण विकास करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पूर्वाचंल एक्सप्रेस वे चे उद्घाटन केले.

दैनिक गोमन्तक

उत्तरप्रदेशचा (Uttar Pradesh) सर्वांगीण विकास करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी पूर्वाचंल एक्सप्रेस वे चे उद्घाटन केले. आगामी काळात देशात पाच राज्यांमध्ये निवडणूका होत आसल्याने राजकीय नेते आश्वासनांची लयलूट करु लागले आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पूर्वाचंलचा विकास करण्यासाठी या एक्सप्रेस वे चे उद्घाटन केले.

दरम्यान, मोदी म्हणाले, ''हा एक्सप्रेस वे उत्तरप्रदेशच्या पायाभूत विकासामधील मुख्य भाग असणार आहे. उत्तरप्रदेशच्या उभारत्या अर्थव्यवस्थेला पुनीत करणारा हा एक्सप्रेस वे ठरणारा आहे. उत्तरप्रदेशची शान म्हणून हा एक्सप्रेस येत्या काळात ओळखला जाईल. देशाचा संपूर्ण विकास करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे तेवढेच आवश्यक आहे. देशातील असमानता दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. विकासाची संभावता असूनही पूर्वाचंल आणि ईशान्य भारताचा विकास म्हणावा तसा झाला नाही. मात्र उत्तरप्रदेशला नव्यावे विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी हा एक्सप्रेस वे महत्वाचा ठरणार आहे.''

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी दुपारी उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये पूर्वांचल एक्स्प्रेसचे उद्घाटन केले. जुलै 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेश सरकारच्या महत्त्वाकांक्षी पूर्वांचल एक्सप्रेसवेची पायाभरणी करण्यात आली. एक्सप्रेसवेचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी भारतीय हवाई दलाच्या C-130J हरक्यूलिस विमानातून पूर्वांचल एक्सप्रेसवे एअरस्ट्रिपवर उतरले. हवाई पट्टीवर राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. 22,500 कोटी रुपये खर्चून बांधलेला पूर्वांचल एक्स्प्रेस वे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौला गाझीपूरशी जोडेल.

पूर्वांचल एक्सप्रेसवे 10 वैशिष्ट्ये

1 पूर्वांचल एक्सप्रेसवे लखनौ जिल्ह्यातील लखनौ-सुलतानपूर रोड (NH-731) वरील चांद सराय या गावापासून सुरु होईल. त्याच वेळी, ते गाझीपूर जिल्ह्यातील यूपी-बिहार सीमेच्या 18 किमी आधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-19 वरील हैदरिया गावाजवळ संपेल.

2 या द्रुतगती मार्गाची एकूण लांबी 340.824 किमी आहे. हा 6 लेनचा एक्स्प्रेस वे बांधण्यात आला आहे, जो भविष्यात 8 लेनमध्ये वाढवला जाऊ शकतो. हा द्रुतगती मार्ग अवघ्या 40 महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाला.

3 या प्रकल्पासाठी एकूण 22,494.66 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अंदाजे खर्चापेक्षा 5 टक्के कमी खर्चात ते तयार करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. संपूर्ण प्रकल्पाची 8 पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली होती.

4 पूर्वांचल द्रुतगती मार्ग लखनौ, बाराबंकी, अमेठी, सुलतानपूर, अयोध्या, आंबेडकर नगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर जिल्ह्यातून जाईल.

5 यासह, पूर्वांचल केवळ राज्याची राजधानी लखनौशीच नाही तर देशाची राजधानी दिल्लीशीही जोडले गेले आहे. त्यामुळे पूर्वेकडून वाहतूक सुरळीत होणार आहे.

6 याच्या मदतीने लखनऊ ते गाझीपूर हा प्रवास अवघ्या 3.5 तासांत करता येणार आहे. त्याचबरोबर यूपीच्या पूर्वेकडील टोकापासून दिल्लीपर्यंतचा प्रवास अवघ्या 10 तासांत पूर्ण करता येईल.

7 स्थानिक लोकांच्या सोयीसाठी 3.75 मीटर रुंद सेवा रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यात 7 मोठे पूल, 7 रेल्वे ओव्हरब्रिज, 114 छोटे पूल आणि 271 अंडरपास आहेत.

8 दोन एक्स्प्रेस वेवर आधारित हवाई पट्टी असलेले यूपी हे देशातील पहिले राज्य आहे. एक हवाई पट्टी लखनौ-आग्रा द्रुतगती मार्गावर आहे आणि दुसरी पूर्वांचल द्रुतगती मार्गावर आहे. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर लढाऊ विमानांचे आपत्कालीन लँडिंग सुलभ करण्यासाठी द्रुतगती मार्गावर 3.2 किमी लांबीची धावपट्टी बांधण्यात आली आहे. एक्स्प्रेसवे एअरस्ट्रीप्स इमर्जन्सी लँडिंग आणि लढाऊ विमानांच्या टेक ऑफसाठी डिझाइन केलेले आहेत.

9 सरकारचे म्हणणे आहे की पूर्वांचल द्रुतगती मार्गाच्या बांधकामामुळे शेतकरी आणि स्थानिक उद्योजकांना त्यांचे उत्पादन किंवा उत्पादने मोठ्या बाजारपेठेत नेणे सोपे होईल. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पूर्वांजलमध्ये लॉजिस्टिक, औद्योगिक पर्यटन क्षेत्राला गती मिळणार आहे.

10 एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूला इन्व्हेस्टमेंट पार्क आणि कारखाने उभारले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT