Prime Minister Modi's meeting with the Security Committee on the Afghan issue Dainik Gomantak
देश

अफगाण मुद्द्यावर पंतप्रधान मोदींची सुरक्षा समितीसोबत बैठक

CCS: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील या बैठकीत उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) ताबा मिळवल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतासह भारताची चिंता वाढली आहे. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावली असल्याची माहिती मिळते आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील या बैठकीत उपस्थित असल्याची माहिती खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

पंतप्रधान सातत्याने उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान काल रात्री उशिरापर्यंत परिस्थितीची चौकशी करत होते आणि त्यांना काबूलहून उड्डाण करण्याबाबतदेखील अपडेट करण्यात आले होते. पंतप्रधानांनी जामनगरला परतलेल्या प्रवाशांसाठी जेवण आणि इतर व्यवस्था करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या अशी माहिती मिळाली आहे.

विशेष म्हणजे काबुलमधील भारतीय राजदूत आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांसह 120 लोकांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मंगळवारी अफगाणिस्तानहून गुजरातमधील जामनगरला पोहोचले. C-19 विमान सकाळी 11.15 वाजता जामनगरमधील हवाई दलाच्या तळावर उतरले आणि नंतर इंधन भरल्यानंतर दुपारी 3 वाजता दिल्लीजवळील हिंडन एअरबेसकडे रवाना झाले. हे विमान संध्याकाळी हिंडन विमानतळावर पोहोचले होते.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानने ताबा मिळाल्यानंतर तेथे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, हे विमान भारतीय कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन परिस्थितीत लोकांना काबूलहून बाहेर काढण्यासाठी गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: कला अकादमी नूतनीकरणाचे काम कृती दलाकडून 'नापास', काय नोंदवले मत वाचा

Snake In Train: झारखंड - गोवा ट्रेनच्या एसी कोचमध्ये आढळला साप, प्रवाशांची पळता भुई थोडी Video

Goa Live Updates: पणजीतील केएफसीला प्रदूषण मंडळाची नोटीस, परवाना मिळेपर्यंत काम बंद ठेवण्याचा आदेश

Online Cricket Betting: पर्वरीत क्रिकेट सट्टाबाजीचा पर्दाफाश; ५ जणांना अटक, सुमारे लाखभर रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

Diwali 2024: फोव कांडप गेलें मात गोंयान 'परंपरा' जपली!

SCROLL FOR NEXT