PM Modi Messi Jearsy Dainik Gomantak
देश

PM Modi Messi Jersey: पंतप्रधान मोदींना बंगळूरमध्ये मिळाले खास गिफ्ट

अर्जेंटिनाच्या उर्जा कंपनीने दिली भेटवस्तू

Akshay Nirmale

PM Modi Messi Jersey: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (6 फेब्रुवारी) कर्नाटकातील बेंगळुरू येथे 'इंडिया एनर्जी वीक 2023' चे उद्घाटन केले. या वेळी पंतप्रधानांना एक खास भेट मिळाली आहे.

अर्जेंटिनाची ऊर्जा कंपनी YPF चे अध्यक्ष पाब्लो गोन्झालेझ यांनी पंतप्रधान मोदींना अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या नावाची अर्जेंटिना फुटबॉल संघाची जर्सी भेट दिली. जर्सीवर कर्णधार लिओनेल मेस्सीचे नाव आणि त्याचा आयकॉनिक नंबर 10 लिहिलेला आहे.

महान फुटबॉलपटूंपैकी एक मानल्या जाणाऱ्या मेस्सीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अर्जेंटिनाला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले होते. लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने फ्रान्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 4-2 असा विजय मिळवला होता. 2022 च्या विश्वचषकात मेस्सीने सात गोल केले होते.

अर्जेंटिनाच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर अर्जेंटिना संघाचे अभिनंदन केले होते. विश्वचषकातील फायनल मॅचनंतर त्यांनी ट्विट केले होते की, "हा आतापर्यंतचा सर्वात रोमांचक फुटबॉल सामना म्हणून लक्षात ठेवला जाईल! अर्जेंटिनाला #FIFAWorldCup चॅम्पियन बनवल्याबद्दल अभिनंदन!

दरम्यान, बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या 'इंडिया एनर्जी वीक 2023' (IEW) ची सांगता 8 फेब्रुवारीला होणार आहे. या परिषदेत जगभरातील 30 हून अधिक मंत्री सहभागी झाले आहेत.

या परिषदेत बोलताना मोदी म्हणाले होते की, 2070 पर्यंत भारताने उर्जा क्षेत्रात परिपुर्णतेसाठी अनेक पावले उचलण्याची तयारी केली आहे. हरित उर्जेला प्रोत्साहन दिले जाईल. त्यातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: ''टीममध्ये काहीतरी गडबड...''! भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवावर चेतेश्वर पुजारा संतापला, फलंदाजांना फटकारले VIDEO

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT