Goa Beach AI Robot: गोव्यात समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षणासाठी आता AI, रोबोटचा वापर

राज्यभरातील समुद्रकिनाऱ्यांवर तैनात करणार 100 ट्रायटन आणि 10 ऑरस युनिट्स
AI Robot on Goa Beach
AI Robot on Goa BeachDainik Gomantak
Published on
Updated on

AI Robot on Goa Beach: दृष्टी मरीन या राज्य-नियुक्त जीवरक्षक एजन्सीने गोव्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांवर जीव वाचवण्याच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी स्वयं-ड्रायव्हिंग रोबोट ऑरस आणि ट्रायटन ही एक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारीत मॉनिटरिंग सिस्टम सादर केली आहे.

समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक, नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच जोखीम कमी करण्यासाठी समुद्रकिनाऱ्याच्या देखरेखीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.

AI Robot on Goa Beach
Turkey Earthquake: तब्बल 3800 ठार... सुमारे 13000 जखमी... तुर्की-सीरीयात शेकडो अजूनही ढिगाऱ्याखाली

ऑरस हा एक स्व-ड्रायव्हिंग रोबोट आहे, जो बीचवर जलतरणासाठी नसलेल्या झोनमध्ये गस्त घालून आणि समुद्राच्या भरतीच्या वेळी पर्यटकांना सतर्क करून जीवरक्षकांना मदत करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. त्याने सुमारे 130 किलोमीटर अंतरावर समुद्रकिनाऱ्यावर 110 तास काम केले आहे.

ट्रायटन समुद्रकिनाऱ्यांचे सर्वसमावेशक कव्हरेज प्रदान करण्यासाठी ऑरसच्या सहकार्याने काम करेल. ट्रायटनने आतापर्यंत 19,000 तासांचा रनटाइम पूर्ण केला आहे.

दोन्ही एआय प्रणाली केंद्रीय नियंत्रण कक्षात तैनात असलेल्या 'टेक लाइफसेव्हर्स'द्वारे ऑपरेट केल्या जातील. ऑरस आणि ट्रायटन कोणत्या भागात गस्त घालणार हे नियंत्रण कक्षातील पथक ठरवेल.

दृष्टी मरीनने यावर्षी 100 ट्रायटन आणि 10 ऑरस मशीन विविध समुद्रकिनाऱ्यांवर तैनात करण्याची योजना आखली आहे. या नव्या सिस्टिममुळे समुद्रकिनार्यावरील देखरेखीची कार्यक्षमता वाढणार आहे.

AI Robot on Goa Beach
Mapusa Municipality: दुकान परवान्‍यांचे नूतनीकरण रखडले; म्हापसा पालिकेला करोडोंचे नुकसान

सध्या या बीचवर तैनात

ऑरस सध्या उत्तर गोव्यातील मिरामार बीच येथे मदतीसाठी तैनात आहे, तर ट्रायटन दक्षिण गोव्यातील बायना, वेळसाओ, बाणावली, गाल्जीबाग आणि उत्तर गोव्यातील मोरजी येथे तैनात आहे.

ऑरस आणि ट्रायटन या दोन्हींमध्ये जीव वाचवण्याची क्षमता आहे. विशेषत: पर्यटनाचा काळ भरात असताना जीवरक्षकांनी समुद्रकिनाऱ्याच्या विस्तीर्ण भागांवर नजर ठेवणे कठिण जात असते. अशा काळात या सिस्टिमचा वापर केला जाऊ शकतो.

आगामी काळात ऑरस, ट्रायटन प्रत्येक समुद्रकिना-याचा एक अत्यावश्यक भाग बनू शकतात. तथापि, त्यांच्यामुळे भारतातील समुद्रकिनारे जगातील सर्वोत्तम आणि संरक्षित समुद्रकिनारे बनतील,” असा विश्वास दृष्टी मरीनतर्फे व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com