Turkey Earthquake: तब्बल 3800 ठार... सुमारे 13000 जखमी... तुर्की-सीरीयात शेकडो अजूनही ढिगाऱ्याखाली

तुर्कीमध्ये 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Turkey Earthquake
Turkey EarthquakeDainik Gomantak

Earthquake kills thousands in Turkey and Syria: मध्यपूर्वेतील चार देश तुर्की, सीरिया, लेबनॉन आणि इस्रायल सोमवारी सकाळी झालेल्या भूकंपाने हादरले होते. येथे 12 तासांत मोठे भूकंप झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू असलेल्या तुर्कस्तान आणि त्याच्या जवळील सीरियाच्या भागात सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळत आहे.

या भुकंपाने तुर्कस्तान आणि सीरियामध्ये प्रचंड हाहाकार माजवला आहे. दोन्ही देशांमध्ये हजारो इमारती कोसळल्या असून त्याच्या ढिगाऱ्याखाली मोठ्या संख्येने लोक गाडले गेले आहेत.

Turkey Earthquake
Bangladesh: बांगलादेशात एकाच वेळी 14 हिंदू मंदिरांवर हल्ला, धार्मिक स्थळांना...

तुर्की आणि सीरियामध्ये आतापर्यंत 3800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लेबनॉन आणि इस्रायलमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, परंतु येथे कोणतेही नुकसान झाले नाही. तुर्कस्तानमध्ये आतापर्यंत 2379 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तर 11 हजार लोक जखमी झाल्याची बातमी आहे. सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्याच वेळी, सीरियामध्ये 1444 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 2 हजारांहून अधिक जखमी झाले.

भारताची मदत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्तानमधील भूकंपात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, 140 कोटी भारतीयांच्या भावना तुर्कीसोबत आहेत. भारत सरकार मदतीसाठी मदत सामग्रीसह NDRF च्या शोध आणि बचाव पथके, प्रशिक्षित श्वान पथके आणि वैद्यकीय पथके तुर्कीला पाठवत आहे.

शाळा आणि महाविद्यालये आठवडाभर बंद

तुर्कीमध्ये 10 शहरांमध्ये इमर्जन्सी आणि रेड अलर्ट आहे. आठवडाभर सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. सध्या 200 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. लष्करासाठी एअर कॉरिडॉर बनवण्यात येत आहे. यात फक्त विमानांना लँडिंग आणि टेकऑफ करण्याची परवानगी असेल.

Turkey Earthquake
Nepal Plane Crash: नेपाळमधील विमान अपघाताबाबत मोठा खुलासा, 72 लोक ठार

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन सध्या 100 बचाव कर्मचार्‍यांसह दोन इलुशिन-76 विमाने पाठवण्याच्या तयारीत आहेत. अंकारा, गाझियानटेप, कहरामनमारस, दियारबाकीर, मालत्या, नुरदगीसह 10 शहरांमध्ये प्रचंड विध्वंस झाला. येथे 1,710 हून अधिक इमारती कोसळल्याची बातमी आहे.

तीन धक्के

तुर्कीतील स्थानिक वेळेनुसार पहिला, सकाळी 4 च्या सुमारास (7.8 रिश्टर स्केल तीव्रता) आणि दुसरा सुमारे 10 वाजता (7.6 रिश्टर स्केल) आणि तिसरा दुपारी 3 वाजता (6.0) असे तीन भुकंपाचे धक्के बसले. याशिवाय 78 आफ्टरशॉकची नोंद झाली आहे. त्यांची तीव्रता 4 ते 5 रिश्टर स्केल इतकी होती.

भूकंपाचा केंद्रबिंदू

या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानचे गाझिआनटेप शहर होते. हे सीरिया सीमेपासून 90 किमी दूर आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या भागात अधिक विध्वंस झाला. दमास्कस, अलेप्पो, हमा, लताकियासह अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com