Rashtrapati Bhavan Dainik Gomantak
देश

President Powers: राष्ट्रपतींचे अधिकारी तुम्हाला माहितीयेत का? वाचा सविस्तर

President Powers: भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे.

दैनिक गोमन्तक

President Powers: भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. द्रौपदी मुर्मू यांना 6,76,803 मते मिळाली, तर विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना 3,80,177 मतांवर समाधान मानावे लागले.

दरम्यान, देशाच्या सर्वोच्च पदावर प्रथमच आदिवासी महिला विराजमान झाल्याबद्दल अनेक बड्या नेत्यांनीही आनंद व्यक्त केला आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, भारताच्या (India) राष्ट्रपतींकडे असे काही अधिकार आहेत जे पंतप्रधानांकडे नाहीत.

राष्ट्रपतींना हे अधिकार आहेत

देशाचा पंतप्रधान न्यायालयीन व्यवस्थेत हस्तक्षेप करत नाही, परंतु भारताच्या राष्ट्रपतींना असा अधिकार आहे, ज्याचा वापर करुन ते न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा माफ करु शकतात. पंतप्रधानांकडे असा अधिकार नाही. याशिवाय देशात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकारही देशाच्या राष्ट्रपतींना आहे. खुद्द पंतप्रधान हे आदेश देऊ शकत नाहीत. तथापि, घटनेच्या अनुच्छेद 74 (1) अन्वये अशी तरतूद करण्यात आली आहे की, राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाचे (Cabinet) सहाय्य असेल आणि त्याचा प्रमुख पंतप्रधान असेल. मात्र राष्ट्रपती त्यांच्या सल्ल्यानेच सर्व आदेश देतात.

द्रौपदी मुर्मू मोठ्या फरकाने विजयी झाल्या

विशेष म्हणजे, द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांची भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना 6,76,803 मूल्यासह 2,824 प्रथम पसंतीची मते मिळाली. त्याच वेळी, संयुक्त विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 1,877 मते मिळाली, ज्यांचे मूल्य 3,80,177 होते. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 64 टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती.

मुर्मू या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले राष्ट्रपती असतील

द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती असतील. याशिवाय त्या आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती असतील. देशाच्या राष्ट्रपती बनलेल्या त्या दुसऱ्या महिला आहेत. द्रौपदी मुर्मू 25 जुलै रोजी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT