President Droupadi Murmu Security Lapse Dainik Gomantak
देश

India President: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी चूक, हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी मोठा अपघात टळला; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

President Droupadi Murmu Security Lapse: देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना केरळमधून समोर आली आहे.

Manish Jadhav

President Droupadi Murmu Security Lapse: केरळमधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (16 ऑक्टोबर) सकाळी राष्ट्रपतींना शबरीमला यात्रेसाठी घेऊन जाणारे हवाई दलाचे (Air Force) हेलिकॉप्टर पथानामथिट्टा जिल्ह्यातील प्रमदम येथील राजीव गांधी इनडोअर स्टेडियमवर असलेल्या एका नव्याने बांधलेल्या कॉंक्रिटच्या हेलिपॅडवर उतरत असताना चिखलात रुतले. राष्ट्रपती मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग केरळच्या प्रमदम येथे झाले, त्यावेळी सुरक्षेतील ही गंभीर चूक समोर आली.

ओले कॉंक्रिट हेलिपॅड भार सहन करु शकले नाही

हेलिकॉप्टरमधून (Helicopter) उतरल्यानंतर राष्ट्रपतींचा ताफा लगेचच पंबामार्गे शबरीमला मंदिराकडे रवाना झाला. मात्र, राष्ट्रपती निघून गेल्यानंतर अनेक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान हेलिपॅडवर हेलिकॉप्टरच्या चाकांमुळे झालेल्या खड्ड्यातून हेलिकॉप्टर बाहेर काढताना दिसले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरला उतरवण्यासाठी जागा ऐनवेळी निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे हेलिपॅडचे बांधकाम मंगळवारी उशीरा रात्री करण्यात आले. परिणामी कॉंक्रिट पूर्णपणे सुकलेले नव्हते. राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर लँड होताच त्याच्या जड वजनामुळे चाके थेट रुतली आणि मोठे खड्डे पडले. सुदैवाने, या घटनेमुळे कोणतीही मोठी दुर्घटना किंवा गडबड झाली नाही.

खराब हवामानामुळे बदलले ठिकाण

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरुवातीला राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग पंब्याजवळ असलेल्या निलक्कल येथे होणार होते. मात्र, खराब हवामानामुळे ऐनवेळी लँडिंगचे ठिकाण बदलून ते प्रमदम येथे निश्चित करण्यात आले. "कॉंक्रिट पूर्णपणे सेट झाले नव्हते, त्यामुळे हेलिकॉप्टर उतरल्यावर ते त्याचा भार सहन करु शकले नाही. चाके जमिनीला टेकली, त्याच ठिकाणी मोठे खड्डे पडले," असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मंगळवारी संध्याकाळी चार दिवसांच्या अधिकृत दक्षिण राज्यांच्या दौऱ्यावर तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाल्या होत्या. बुधवार सकाळी त्या पथानामथिट्टा जिल्ह्यासाठी रवाना झाल्या, जिथे त्या शबरीमला मंदिरात दर्शन घेणार आहेत. या महत्त्वाच्या दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील या चुकीमुळे मोठी चर्चा आणि चिंता व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana: लग्न मोडलं... स्मृती मानधनाने पोस्ट करत लग्नाबाबत स्पष्टचं सांगितलं, पाहा पोस्ट

Shivaji Maharaj Cavalry: राज्याभिषेकानंतर आई जिजाऊसाहेबांनी शिवरायांना आग्रहाने कृष्णा घोड्यावर बसवले होते; छत्रपतींचे समृद्ध घोडदळ

Goa Nightclub Fire: डान्स सुरू असतानाच भडकल्या ज्वाळा; हडफडे क्लबमधील दुर्घटनेचा थरार दर्शवणारा 'तो' Video Viral!

Goa Live News: हडफडे आग दुर्घटनेतील पीडितांची मंत्र्यांनी घेतली भेट; रोहन खंवटे यांची कठोर कारवाईची मागणी

Konkani Word Etymology: ‘बाप’ हा शब्द सध्याच्या कुंळबी भाषेतील ‘आब’ या ‘वडील’ अर्थाच्या शब्दाचे रूप; कोकणी शब्दांचे कुरुंब मूळ

SCROLL FOR NEXT