
नवी दिल्ली: ‘‘आर्थिक क्षेत्रात भारताचे कर्तृत्व ठळकपणे दिसणारे आहे. मागील आर्थिक वर्षातला जीडीपी वाढीचा दर ६.५ टक्के असून, भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे,’’ अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची सक्षमता अधोरेखित केली.
यासोबतच, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा आपले सैन्य कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास पूर्णपणे सक्षम आहे हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने दाखवून दिले असल्याचे प्रतिपादन करत राष्ट्रपतींनी भारताने दहशतवादाला निर्णायक प्रत्युत्तर दिल्याचेही ठणकावून सांगितले.
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये राष्ट्रपती मुर्मू यांनी ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी भारताच्या ऐतिहासिक संघर्ष, लोकशाही मूल्ये, आर्थिक प्रगती, तांत्रिक विकास आणि सामाजिक समावेश यांचा व्यापक आढावा घेतला.
भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल राष्ट्रपती म्हणाल्या, ‘‘जागतिक अर्थव्यवस्थेत अडचणी असूनही देशांतर्गत मागणी झपाट्याने वाढत आहे. महागाई नियंत्रणात आहे. निर्यात वाढत आहे. सर्व प्रमुख निर्देशांक अर्थव्यवस्थेची मजबूत स्थिती दर्शवित आहेत. हे आपल्या सुनियोजित सुधारणा आणि कार्यक्षम आर्थिक व्यवस्थापनाचा परिपाक आहे.’’
पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी या हल्ल्याला भारताने पोलादी निर्धाराने प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले. ‘‘राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा आपले सैन्य कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम आहे, हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिले. सामरिक स्पष्टता व तांत्रिक कौशल्याच्या जोरावर आपल्या सैन्याने सीमेपलीकडील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
दहशतवादाविरोधातील लढ्यात एक उदाहरण म्हणून ऑपरेशन सिंदूर इतिहासात नोंदले जाईल,’’ असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
नागरिकांनी स्वदेशी उत्पादने वापरण्याचा संकल्प करावा
स्वदेशी संरक्षण उत्पादनांमुळे आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय सुरू
एकजूट हेच शत्रूला सडेतोड उत्तर
नागरिकांच्या रक्षणासाठी प्रत्युत्तर देण्यास मागेपुढे पाहणार नाही
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.