Kerala CM VS Governor Dainik Gomantak
देश

Kerala CM VS Governor: राज्यपालांना कुलपतीपदावरून हटविण्याची तयारी; केरळ सरकार आणणार अध्यादेश

मंत्रीमंडळ बैठकीतही निर्णय; कुलगुरुंच्या नियुक्त्यांवरून वाद

गोमन्तक डिजिटल टीम

Kerala CM VS Governor: केरळमध्ये सुरू असलेल्या राज्यपाल विरूद्ध राज्य सरकार या वादाने आता गंभीर वळण घ्यायला सुरवात केली आहे. कारण केरळ राज्य सरकारने आता राज्यपालांना राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलपतीपदावरून हटविण्याची तयारी केली आहे. त्यासाठी अध्यादेश (Ordinance) आणण्याची तयारी केरळमधील मुख्यमंत्री पी. विजयन (Pinarayi Vijayan) यांचे सरकार करत आहे.

विद्यापीठातील कुलगुरुंच्या नियुक्त्यांवरून सध्या सुरू असलेल्या विरोधात राज्य सरकार हे पाऊल उचलू शकते.

केरळमध्ये राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) विरूद्ध मुख्यमंत्री पी. विजयन यांच्यातील वाद वाढत चालला आहे. मुख्यमंत्री हे त्यांच्या पक्षाशी संबंधित नियुक्त्या विद्यापीठांमध्ये करत असल्याचा आरोप करत राज्यपाल खान यांनी केला होता. तसेच काही दिवसांपुर्वी त्यांनी अनेक विद्यापीठांच्या कुलगुरूंना राजीनामा देण्याचे निर्देश दिले होते.

राज्यपालांच्या या पवित्र्यानंतर मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या सरकारनेही राज्यपालांना सर्व विद्यापीठांच्या कुलपतीपदावरून हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्री विजयन हे त्यासाठी एक अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेच्या आगामी अधिवेशनात हा अध्यादेश आणला जाऊ शकतो. तसा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

केरळचे उच्च शिक्षण मंत्री आर. बिंदू म्हणाले की, एलडीएफ सरकारच्या एका अध्यादेशाद्वारे राज्याच्या विद्यापीठांमध्ये चान्सलर (कुलपती) म्हणून राज्यपाल यांच्या जागी शिक्षणतज्ज्ञ आणण्याचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सुत्रांच्या माहितीनुसार मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिंदू म्हणाले की, सरकारने राज्याच्या उच्च शिक्षणात आणि विद्यापीठांमध्ये सुधारणेसाठी हा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे जो अध्यादेश राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना कुलपतीपदावरून हटविण्यासाठी राज्य सरकार आणणार आहे, तो सहीसाठी राज्यपालांकडेच पाठवला जाणार आहे. याविषयी बोलताना बिंदू यांनी संगितले की, राज्यपाल त्यांच्या संवैधानिक कर्तव्यांचे पालन करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT