Prayagaraj Police Encounter Dainik Gomantak
देश

Prayagaraj Police Encounter: उमेश पाल हत्याकांडातील आरोपी ठार, नेहरु पार्कमध्ये चकमक

Prayagaraj Police: उमेश पाल याची शुक्रवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Manish Jadhav

Prayagaraj Police Encounter: राजू पाल खून प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी ठार केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि जिल्हा पोलिसांनी आरोपी अरबाजला प्रयागराजमधील नेहरु पार्कमध्ये चकमकीत ठार केले.

दरम्यान, 2005 मध्ये बसपा आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल याची शुक्रवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज येथील राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेत वापरलेली क्रेटा कार आरोपी अरबाज चालवत होता. आरोपीचे दोन्ही साथीदार घटनास्थळावरुन पळून गेले होते.

दुसरीकडे, प्रयागराजमध्ये (Prayagraj) हुंडई क्रेटा एसयूव्हीच्या मागील सीटवरुन खाली उतरणाऱ्या उमेश पाल यांची अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून हत्या केली होती. पाल यांना स्वरुप राणी नेहरु रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

तसेच, हत्येनंतर उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी प्रयागराज पोलिसात तक्रार करुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. माजी खासदार अतिक अहमद यांचा भाऊ, पत्नी सहिस्ता आणि त्यांची मुले अहजान आणि आबान आणि इतर अनेकांविरुद्ध आयपीसी आणि स्फोटक कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT