Sidu Moose wala Murder case: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येतील दोघा संशयितांचा तुरूंगात खून

तुरूंगात टोळीयुद्धात धारदार शस्त्रांनी वार; लॉरेन्स टोळीने जबाबदारी घेतली
Sidhu Moose Wala
Sidhu Moose WalaDainik Gomantak
Published on
Updated on

Sidu Moose wala Murder case: पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणातील 2 गुन्हेगार तुरुंगात टोळीयुद्धात मारले गेले. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील गोइंदवाल तुरुंगात रविवारी हिंसक झटापट झाली. यात मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग मोहना हे गुंड मारले गेले.

आणखी एक संशयित केशवची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांच्याही डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Sidhu Moose Wala
BJP Selfie Campaign: देशातील 'या' महिलांसाठी भाजपची '1 कोटी सेल्फी' मोहीम

तरनतारनचे आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. जगजीत सिंग यांनी सांगितले की, कारागृहातून दुपारी आणलेल्या तीन जखमींपैकी दोघांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला होता, तर तिसर्‍याची प्रकृती चिंताजनक होती.

तुफान गायक मुसेवालाच्या हत्येवेळी मारला गेलेला गुंड मनदीप सिंगचा स्टँडबाय शूटर म्हणून उपस्थित होता. तो जग्गू भगवानपुरिया टोळीचा सदस्य होता.

दरम्यान, लॉरेन्स टोळीने गोइंदवाल तुरुंगात मोहना मानसा आणि मनदीप तुफान यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. त्यांना आमचे भाऊ सचिन भिवानी, अंकित सेरसा, दीपक मुंडी, मनप्रीत भाऊ, कशिश, अर्शद बिकानेर आणि मामा किट्टा यांनी मारले, अशी माहिती लॉरेन्स टोळीच्या गोल्डी ब्रारने दिली आहे.

ब्रार म्हणाला की, जग्गूच्या सांगण्यावरून त्यांनी दोन दिवसांपूर्वी आमच्या मनप्रीत भाऊ धैपई याला मारहाण केली होती. आज आमच्या भावांनी त्यांना मारले. या जग्गूने सापळा रचून रुपा आणि मन्नू या आमच्या भावांना चकमकीत ठार केले होते.

Sidhu Moose Wala
Manish Sisodia Arrested: केजरीवालांचा अंदाज ठरला खरा; दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना CBI ने केली अटक

कारागृहात कैद्यांशी गुंड मनदीप सिंग तुफानचे काही कारणावरून भांडण झाले होते. यानंतर कैद्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या हाणामारीत अन्य तीन ते चार कैदीही जखमी झाल्याची माहिती आहे.

तुरुंगाचे सहायक अधीक्षक हरीश कुमार यांनी सांगितले की, या लोकांचे आपापसात भांडण झाले. मुसेवाला हत्येतील सर्व गुंड एकाच ठिकाणी बंदिस्त होते. तेथे सुरक्षाही होती.

मुसेवाला यांची गतवर्षी २९ मे रोजी हत्या करण्यात आली होती

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची 29 मे 2022 रोजी मानसाच्या जवाहरके गावात सायंकाळी 5.30 वाजता हत्या करण्यात आली होती. मूसेवाला यांच्यावर सुमारे 40 राऊंड फायर केले होते. मुसेवाला यांच्या शरीरावर 19 जखमा आढळल्या.

7 गोळ्या थेट मुसेवाला यांना लागल्या. गोळी लागल्याच्या १५ मिनिटांत मुसेवाला यांचा मृत्यू झाला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com