Sidhu Moose Wala Case: सिद्धू मूसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार ताब्यात

सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा मानला जातो.
Sidhu Moose Wala Case
Sidhu Moose Wala CaseDainik Gomantak
Published on
Updated on

कुख्यात आंतरराष्ट्रीय गँगस्टर आणि सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) खून प्रकरणाचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रारला (Goldy Brar) कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. गोल्डी ब्रारला 20 नोव्हेंबरला कॅलिफोर्नियामध्ये प्रथम ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, भारत सरकारला याबाबत कॅलिफोर्नियाकडून कोणतेही अधिकृत निवेदन मिळालेले नाही.

(Sidhu Moose Wala Murder Mastermind Goldy Brar Detained In California)

Sidhu Moose Wala Case
PM Modi Video: पंतप्रधान मोदींनी रुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी थांबवला ताफा

सिद्दू मुसेवाला हत्याकांडातील मास्टरमाईंड गोल्डी ब्रारबाबत भारतीय गुप्तचर विभाग रॉ, आयबी, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि पंजाब इंटेलिजन्सला याबाबत इनपुट मिळाले आहेत. गोल्डी ब्रारबाबत कॅलिफोर्नियामध्ये लोकेट करून ताब्यात घेण्यात आले. गोल्डी ब्रार कॅलिफोर्नियात Sacramento, FRIZOW आणि सॉल्ट लेक या शहरांत विविध ठिकाणी तो राहत होता. गोल्डी ब्रार बराच काळ कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो शहरात राहत होता. व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर असलेल्या गोल्डी ब्रारला कॅनडात सुरक्षित वाटत नसल्याने कॅलिफोर्नियात शिफ्ट झाला होता.

Sidhu Moose Wala Case
Petrol-Diesel Price In Goa: कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव काय?

कोण आहे गोल्डी ब्रार?

सतींदरजीत सिंग उर्फ ​​गोल्डी ब्रार हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा मानला जातो. पंजाबमधील न्यायालयाने युवक काँग्रेसचे नेते गुरलाल सिंग पहेलवान यांच्या हत्येप्रकरणी गोल्डी ब्रारविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. गोल्डी ब्रार 16 हून अधिक गुन्ह्यांमध्ये वाँटेड आहे. ​​गोल्डी ब्रार 2017 मध्ये स्टुडंट व्हिसावर कॅनडाला गेला. गोल्डीकडे BA ची पदवी आहे. गोल्डी हा A+ श्रेणीचा गुंड असून, कोर्टाने देखील त्याला गुन्हेगार घोषित केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com