Himachal Pradesh New CM: हिमाचलमधील निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल 48 तासांनंतर काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्र्यांबाबतचा गुंता सोडवला आहे. ज्येष्ठ नेते सुखविंदर सिंह सुक्खू हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्रीपदाच्या या शर्यतीत त्यांच्याशिवाय प्रतिभा सिंह यांचाही समावेश होता. 30 वर्षांहून अधिक काळ हिमाचलवर वीरभद्र घराण्याची मक्तेदारी राहिली आहे.
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या निधनानंतर काँग्रेसने पक्षाची कमान प्रतिभा यांच्याकडे सोपवली. त्यांच्या नेतृत्वाखालीच पक्षाने निवडणूकही जिंकली, पण आता शेवटच्या क्षणी त्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्या. आता त्यांचे समर्थक रस्त्यावर आले आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या प्रतिभा मागे कशा राहिल्या? चला जाणून घेऊया...
1. निवडणूक निकालानंतर वक्तव्य
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर प्रतिभा सिंह सातत्याने सीएम पदाच्या खुर्चीबाबत वक्तव्य करत होत्या. वीरभद्र सिंग यांचा वारसा पुढे नेत त्या स्वत:ला सर्वात मोठा दावेदार म्हणून दाखवत होत्या. त्या विजयाचे सर्व श्रेयही वीरभद्र सिंह यांच्या धोरणाला देत होत्या. सरकार स्थापनेच्या दाव्याबाबत काँग्रेसचे (Congress) निरीक्षक राज्यपालांना भेटायला गेले असता त्यांनी त्यावरही प्रश्न उपस्थित केले. दुसरीकडे, सुक्खू यांनी मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय हायकमांडवर सोडला. त्याचे बक्षीस त्यांना मुख्यमंत्री म्हणून मिळाले.
2. खासदार पद हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा सापळा ठरले
प्रतिभा सिंह (Pratibha Singh) सध्या मंडी मतदारसंघातून खासदार आहेत. काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केले असते तर मंडीत पोटनिवडणूक घ्यावी लागली असती. त्याचवेळी त्यांना आमदार करण्यासाठी एक जागाही सोडावी लागली असती. म्हणजे दोन पोटनिवडणुका. ही परिस्थिती टाळण्यासाठी काँग्रेस हायकमांडने आमदाराला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर प्रतिभा सिंह या शर्यतीतून बाहेर पडल्या.
3. मंडीतील काँग्रेसची कामगिरी फारच खराब
प्रतिभा सिंह सध्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 68 पैकी 40 जागा जिंकल्या आहेत. मात्र, प्रतिभा त्यांच्या गृह जिल्ह्यात अपयशी ठरल्या. मंडी जिल्ह्यातील 10 पैकी 9 विधानसभेच्या जागा काँग्रेसने गमावल्या आहेत. मंडीतील काँग्रेसची कामगिरीही प्रतिभा यांच्या मार्गात अडथळा ठरली.
4. परिवारवाद अडथळा ठरला
उदयपूर कॅम्पमधील निवडणुकीत एका कुटुंबातील एका व्यक्तीला तिकीट देण्याचा फॉर्म्युला काँग्रेसने पार केला आहे. प्रतिभा यांचा मुलगा विक्रमादित्य सिमला ग्रामीण मतदारसंघातून आमदार झाला आहे. अशा परिस्थितीत हायकमांडने प्रतिभा यांना मुख्यमंत्री केले असते तर पक्षातच परिवादवादाचा प्रश्न निर्माण झाला असता. यासोबतच निवडणुकीत (Election) जिंकून आलेले बहुतांश आमदारही प्रतिभा यांच्या विरोधात होते.
5. राहुल गांधी यांच्याजवळ असल्याचा फायदा सक्खूंना मिळाला
सुखविंदर सिंह सुक्खू यांची गणना राहुल गांधी जवळच्या नेत्यांमध्ये केली जाते. 2013 मध्ये जेव्हा राहुल प्रत्येक राज्यात आपली टीम तयार करत होते, तेव्हा त्यांनी सक्खू यांना हिमाचल काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पाठवले. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी याला कडाडून विरोध केला होता. सक्खू 2019 पर्यंत हिमाचल काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. 2022 मध्ये त्यांना राज्य प्रचार समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.