Pooja Bhatt Congress Bharat Jodo Yatra ANI
देश

राहुल गांधींना 'Bharat Jodo Yatra' मध्ये अभिनेत्री पूजा भटने दिली साथ

Pooja Bhatt Congress Bharat Jodo Yatra: हैदराबादमध्ये अभिनेत्री पूजा भट्ट राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत दिसली होती.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती पूजा भट्ट काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे. सध्या ही यात्रा हैदराबाद येथे पोहोचली असून या यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह पूजा भट्टही सहभागी झाली आहे. पूजा भट्टचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत जोडो यात्रेत सहभागी होणारी पूजा भट्ट (Pooja Bhatt) पहिलीच बॉलिवूड सेलिब्रिटी आहे. या यात्रेदरम्यान पूजा भट्टनं फुल स्लीव्हजचा काळ्या रंगाचा कुर्ता आणि प्रिंटेड स्टोल परिधान केला होता. पूजानं हात हलवून समर्थकांचं स्वागत केलं. यादरम्यान तिला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. 

यापूर्वी स्वरा भास्करनं राहुल गांधी आणि भारत जोडा यात्रेचं कौतुक केलं होतं. अभिनेत्रीनं ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, "निवडणुकीत पराभव, ट्रोलिंग, वैयक्तिक हल्ले आणि सतत टीका होत असतानाही राहुल गांधी ना तेढ वाढवणाऱ्या वक्तव्यांना बळी पडले, ना राजकारणाला बळी पडले. या देशाची स्थिती पाहता भारत जोडो यात्रेसारखा प्रयत्न कौतुकास्पद आहे." तसेच, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी तेलंगणातील हैदराबाद येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली. शहरातील वाहतूक पोलिसांनी मोर्चासंदर्भात वाहतूकीत बदल केले आहेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT