Political News: Political situation in country

 
Dainik Gomantak
देश

निवडणुका येताच ते हिंदू होतात...

"जो विकास 50 वर्षांत झाला नाही, तो विकास भाजप सरकारने दोन वर्षांत स्मृती इराणींच्या प्रयत्नाने करून दाखवला."

दैनिक गोमन्तक

Political News: अमेठी येथील नवोदय विद्यालयातील आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही देशात शिक्षण, औषध, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नव्हती, परंतु अटलजींच्या (माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक विकासात्मक कामे किली आहेत. या दिशेने काम सुरू झाले असून आज देशातील साडेसहा लाख गावांपैकी पाच लाख गावे प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून पक्क्या रस्त्याने जोडली गेली आहेत.

नेहरू-गांधी कुटुंबावर टोला देत केंद्रीय मंत्री म्हणाले, "जो विकास 50 वर्षांत झाला नाही, तो विकास भाजप (BJP) सरकारने दोन वर्षांत स्मृती इराणींच्या (Smriti Irani) प्रयत्नाने करून दाखवला."

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल आणि प्रियंका (Priyanka Gandhi) यांचा खरपूस समाचार घेत अमेठी या ठिकाणी ज्यांनी पाच दशके राज्य केले, त्यांच्यासोबत आज कोणीही नाही. भूतकाळातील राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) दौऱ्याचा संदर्भ देत इराणी यांनी दावा केला की त्यांच्या सभेसाठी गर्दी जमवण्या करिता छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि संत कबीर नगर येथून लोकांना बोलावण्यात आले होते.

"ज्यांनी मला मतदान केले आणि ज्यांनी अमेठीत मत दिले ते माझे आहेत आणि त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारचे असभ्य वर्तन खपवून घेणार नाही," असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

ते म्हणाले की जेव्हा भाऊ आणि बहिणी (राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वढेरा) आले होते तेव्हा येथील लोकांशी भांडण झाले होते. अमेठीच्या जनतेला काही झाले तर याद राखा असा इशारा त्यांनी दिला.

अमेठीत अडीच वर्षांत 83 हजार कोटींची योजना राबवल्याचा दावा करत केंद्रीय मंत्र्यांनी राहुल गांधींना आव्हान दिले की, काँग्रेसने 70 वर्षांत अमेठीत किती विकास केला?

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, सपा, बसपा, काँग्रेसमध्ये फरक नाही, सर्व एकाच थाळीचे तुकडे आहेत. अमेठीच्या सर्व जागांवर विजयाचा दावा करत ते म्हणाले की, 2017 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळीची निवडणूक महत्त्वाची आहे. मौर्य यांनी सपा, बसपा आणि काँग्रेसवर धर्म आणि जातीवादाचे राजकारण केल्याचा आरोप केला आणि ते म्हणाले की, निवडणुका येताच ते हिंदू होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT