बिहारमधील कारखान्यात बॉयलरचा स्फोट; 6 मजूर ठार

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Explosion

Explosion

Dainik Gomantak 

Published on
Updated on

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील नूडल बनवणाऱ्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन किमान 6 मजूर ठार तर डझनहून अधिक जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताच्या वेळी कारखान्यात किती लोक काम करत होते याची माहिती मिळू शकलेली नाही.

<div class="paragraphs"><p>Explosion</p></div>
दिल्लीत IAS ऑफिसरच्या मुलाची आत्महत्या, सहाव्या मजल्यावरून मारली उडी

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट (Explosion) इतका जोरदार होता की त्याचा आवाज स्फोटाच्या ठिकाणापासून 5 कि.मी. दूर ऐकू आला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) किमान 5 गाड्या (Vehicles) दाखल झाल्या होत्या. आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा स्फोट झाला तेव्हा त्यांना मोठा आवाज आला. घटनेचे नेमके कारण अजून कळू शकलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com