Boris Johnson  Dainik Gomantak
देश

'मोदी खास दोस्त' म्हणत, ब्रिटनच्या पंतप्रधानांनी बांधले कौतुकाचे पुल

"माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र, माझे "खास दोस्त" आहेत, आम्ही येथे भारतात काही दिवस छान घालवले आहेत.

दैनिक गोमन्तक

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) यांनी शुक्रवारी त्यांचे "खास दोस्त" पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भारतात मिळालेल्या "आश्चर्यकारक स्वागता" बद्दल आभार मानले आणि ते म्हणाले की त्यांना क्रिकेटचा महान सचिन तेंडुलकरसारखे आणि मेगास्टार अमिताभ बच्चन सारखे वाटले आहे. (PM of the United Kingdom Boris Johnson has praised Modi as a special friend)

"माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र, माझे "खास दोस्त" आहेत, आम्ही येथे भारतात काही दिवस छान घालवले आहेत. आणि काल, तुमचे जन्मस्थान असलेल्या गुजरातला भेट देणारा मी पहिला कंझर्वेटिव्ह पंतप्रधान झालो आहे. माझे अप्रतिम स्वागत झाले,” यावेळी बोरिस जॉनसन पंतप्रधान मोदींसोबतच्या संयुक्त भाषणात म्हणाले.

"माझ्या आगमनानंतर मला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सारखे वाटले आहे. आणि मला ते सर्वत्र दिसत होते. ते विलक्षण होते," असे ब्रिटिश पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदी आणि ब्रिटीश पंतप्रधान यांनी हैदराबाद हाऊस येथे शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेत भाग घेतला आणि भारत आणि युनायटेड किंगडममधील करारांची देवाणघेवाण देखील मी पाहिली आहे. चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार बैठक घेतली.

आज तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी जॉनसन यांचे नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत ही केले. तर पीएम मोदींनी ट्विट केले होते की, "माझे मित्र PM @BorisJohnson, तुम्हाला भारताच्या बहुप्रतिक्षित भेटीवर पाहून आनंद झाला आहे. "ब्रिटिश पंतप्रधानांनी आज राजघाटावर पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आहे. बोरिस जॉनसन गुरुवारी उशिरा दिल्लीत दाखल झाले आणि त्याआधी आज महात्मा गांधींना राजघाटावरील त्यांच्या समाधीवर आदरांजली देखील वाहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT