Gujarat Election Result: Dainik Gomantak
देश

Gujarat Election Result: देशात नरेंद्र, गुजरातमध्ये भुपेंद्र; मोदींचे भाकीत ठरले खरे...

भुपेंद्र पटेल यांनी मिळवला गुजरातच्या इतिहासातील विक्रमी सर्वात मोठा विजय

Akshay Nirmale

Gujarat Election Result: गुजरातमध्ये भाजपने 182 पैकी 156 जागा जिंकत नवा विक्रम नोंदवला आहे. यापुर्वी काँग्रेसने 1985 मध्ये माधवसिंह सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या 149 जागा जिंकल्या होत्या. तर नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असताना 2002 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने 127 जागा जिंकल्या होत्या. यंदा मात्र भुपेंद्र पटेल यांनी हे सर्व विक्रम मोडत 156 जागा जिंकून नवा विक्रम नोंदवला आहे. हा गुजरातच्या इतिहासातील सर्वात मोठी निवडणूक विजय ठरला आहे.

विशेष म्हणजे, प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी नरेंद्रचा विक्रम भुपेंद्र मोडेल, असा विश्वास व्यक्त केला होता. निवडणुकीचा निकाल पाहता मोदींचे हे भाकीत खरे ठरले आहे. दरम्यान, या ऐतिहासिक विजयानंतर 12 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे. गांधीनगर विधानसभेतील हेलिपॅड मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

गुजरातमधील 182 पैकी भाजपने 156 जागा जिंकल्या आहेत. 2017 च्या तुलनेत भाजपने 58 जागा अधिक जिंकल्या आहेत. तर काँग्रेसचे गत निवडणुकीच्या तुलनेत 60 जागांचे नुकसान झाले आहे. गतवेळी काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या यावेळी काँग्रेसला केवळ 17 जागांवर विजय मिळाला आहे.

या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मतदारांचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, गुजरातचे धन्यवाद. लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशिर्वाद दिला आहे. गुजरातच्या जनशक्तीसमोर मी शिर झुकवतो आहे. तर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल म्हणाले की, जनादेश स्पष्ट आहे. लोकांनी यावेळी ठरवले होते, त्यांना काय हवे आहे. दोन दशकांपासून सुरू असलेल्या गुजरातच्या विकास यात्रेला सुरू ठेऊ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT