Gujarat Election Result: गुजरातमधील 'या' 9 मतदारसंघांकडे होते देशाचे लक्ष

सर्व मतदारसंघात भाजपकडून विरोधकांचा धुव्वा
Gujrat and Himachal Pradesh Election Result
Gujrat and Himachal Pradesh Election ResultDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Election Result: गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 156 जागांसह विजय मिळवला आहे. हा भाजपचा विक्रमी विजय आहे. दरम्यान, राज्यातील 9 जागांवर संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. या सर्वही 9 हॉट मतदारसंघांमध्येही भाजपनेच बाजी मारली आहे. जाणून घेऊया या 9 मतदरासंघातील निकालाविषयी...

Gujrat and Himachal Pradesh Election Result
Himachal Pradesh Election Result: हिमाचल प्रदेशात 11 पैकी 5 मंत्री पराभूत

1. घाटलोडिया (अहमदाबाद)

गुजरातला दोन मुख्यमंत्री देणारा हा मतदारसंघ आहे. भुपेंद्र पटेल आणि आनंदीबेन पटेल असे दोन मुख्यमंत्री या मतदारसंघाने दिले आहेत. घाटलोदिया येथून यंदा विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे रिंगणात होते. पाटीदार मतदारांचा भरणा असलेल्या या मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार अमी बेन याग्निक यांचा पराभव केला.

2. राजकोट वेस्ट

येथून भाजपच्या दर्शिता शाह यांनी विजय मिळवला. नरेंद्र मोदी यांनी 2002 मध्ये पहिली निवडणूक येथून लढवली होती. माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी येथून 53 हजार मतांनी विजय मिळवला होता. यावेळी येथून दर्शिता शाह यांनी बाजी मारली.

3. जामनगर नॉर्थ

या मतदारसंघात जडेजा विरूद्ध जडेजा अशी लढत होती. क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याची पत्नी रिवाबा यांनी भाजपकडून विजय मिळवला. येथून काँग्रेसने बिपेंद्रसिंह जडेजा यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात रिवाबा यांची नणंद आणि रविंद्र जडेजा याची बहिण नयनाबा यांनी रिवाबा यांच्या विरोधात प्रचार केला होता. नयनाबा या जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. रिवाबा यांचे सासरे अनिरूद्ध जडेजा देखील काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करत होते.

4. विरमगाम (अहमदाबाद)

काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामिल झालेल्या हार्दिक पटेल यांनी विरमगाम येथून निवडणूक जिंकली. गत दोन निवडणुकांत ही जागा काँग्रेसने जिंकली होती. काँग्रेस नेते लाखाभाई भारवाड यांना येथून पराभव स्विकारावा लागला. ते यापुर्वी 2002 आणि 2007 मध्ये येथून त्यांनी विजय मिळवला होता.

Gujrat and Himachal Pradesh Election Result
Gujarat and Himachal Election Result : गुजरातमध्ये भाजपची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

5. मोरबी

पुल दुर्घटनेमुळे चर्चेत आलेल्या मोरबी मतदारसंघात भाजपच्या कांतीलाल अमृतिया यांनी विजय मिळवला. त्यांनी या मतदारसंघातून पाच वेळा विजय मिळवला होता. पण 2017 मध्ये त्यांना काँग्रेसच्या बृजेश मेरजा यांनी पराभूत केले होते. निवडणुकीनंतर मेरजा आमदारकी सोडून भाजपमध्ये आले होते. त्यानंतर पोटनिवडणुकीत पुन्हा मेरजा विजयी झाले होते. यंदा भाजपने अमृतिया यांना तिकीट दिले होते. मोरबी पुल दुर्घटनेवेळी लोकांचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी मच्छु नदीत उडी घेतली होती.

6. मणिनगर (अहमदाबाद)

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना या मतदारसंघातून 2007 आणि 2012 असे दोनवेळा निवडून आले होते. गेल्या आठ निवडणुकीत ही जागा भाजपकडेच आहे. येथून भाजपच्या अमूल भट्ट यांनी विजय मिळवला.

7. नारणपुरा (अहमदाबाद)

2008 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर 2012 मध्ये हा मतदारसंघ तयार झाला होता. येथून पहिल्यांदा अमित शहा यांनी मोठा विजय मिळवला होता. 2017 मध्ये भाजपचे कौशिकभाई पटेल यांनी विजय मिळवला होता. यंदा येथून भाजपच्या जितेंद्रभाई पटेल यांनी विजय मिळवला.

8. खंभालिया (द्वारका)

आप चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी या मतदारसंघातून पराभूत झाले. येथून भाजपचे मुलुभाई हरदासभाई बेरा यांनी यंदा विजय मिळवला होता.

9. बायड (अरावली)

माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेल यांचा पुत्र महेंद्रसिंह हे येथून पराभूत झाले. 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. 2017 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण तीन महिन्यांनंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते. येथे यंदा भाजपने भीखीबेन परमार यांना तिकीट दिले होते. परमार येथून विजयी झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com