Himachal Pradesh Election Result: हिमाचल प्रदेशात भाजप सरकारला अँटी इन्कमबन्सीचा फटका बसला आहे. राज्यात भाजपला 28 जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेस 40 जागांवर आघाडीवर आहे. राज्यात एकुण 68 जागा आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या मंत्रीमंडळातील 11 पैकी 5 मंत्री पराभूत झाले आहेत.
डॉ. रामलाल मारकंडा
जयराम ठाकूर यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री डॉ. रामलाल मारकंडा हे लाहौल स्पिती या मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांना काँग्रेसच्या रवी ठाकूर यांनी मात दिली.
सरवीन चौधरी
कांगडा जिल्ह्यातील शाहपूर मतदारसंघातून मंत्री सरवीन चौधरी पराभूत झाल्या आहेत. येथून काँग्रेसचे केवलसिंह पठानिया विजयी झाले आहेत.
सुरेश भारद्वाज
हिमालच प्रदेशचे नगरविकास मंत्री सुरेश भारद्वाज शिमला जिल्ह्यातील कसुमपटी येथून पराभूत झाले आहेत. त्यांना काँग्रेसच्या अनिरूद्ध सिंह यांनी पराभूत केले. भारद्वाज हे शिमला शहर मतदारसंघातून चार वेळा निवडून आले होते. यावेळी भाजपमधील वरिष्ठांनी त्यांचा मतदारसंघ बदलून त्यांना कसुमपटी येथून उमेदवारी दिली होती. पण भाजपचा हा डाव त्यांच्या अंगलट आला आहे.
डॉ. राजीव सैजल
सोलन जिल्ह्यातील कसौली मतदारसंघातून आरोग्य मंत्री डॉ. राजीव सैजल देखील पराभूत झाले आहेत. काँग्रेसच्या विनोद सुलतानपुरी यांनी त्यांना पराभूत केले आहे.
गोविंद सिंह ठाकूर
शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकूर देखील यांनादेखील या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. मनाली मतदारसंघातून काँग्रेसच्या भुवनेश्वर गौड यांनी त्यांना पराभूत केले.
दरम्यान, हिमाचल प्रदेशातील गेल्या चार विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला तर येथे नेहमीच मंत्रीमंडळातील निम्मे किंवा त्याहून अधिक मंत्री पराभूत झाल्याचा इतिहास आहे. 2017 मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या मंत्रीमंडळातील 11 पैकी 5 मंत्री पराभूत झाले होते. त्यानंतर 2012 मध्ये भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल यांच्या मंत्रीमंडळातील 10 पैकी 4 मंत्री पराभूत झाले होते. 2007 मध्ये वीरभद्र सिंह यांनी एक वर्ष आधीच निवडणूक घेतली. पण यावेळीही 10 पैकी 6 मंत्र्यांना पराभवामुळे आपला मतदारसंघ गमवावा लागला. 2003 में भाजपचे मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल यांच्या मंत्रीमंडळातील 11 पैकी 6 मंत्र्यांना विजय मिळवता आला नव्हता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.