BJP Selfie Campaign Dainik Gomantak
देश

BJP Selfie Campaign: देशातील 'या' महिलांसाठी भाजपची '1 कोटी सेल्फी' मोहीम

पंतप्रधान मोदी उद्या करणार प्रारंभ

Akshay Nirmale

BJP Selfie with Beneficiary Campaign: सन २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने देशातील निम्म्या लोकसंख्येपर्यंत पोहचण्यासाठी एक मेगा प्लॅन बनवला आहे. सोमवारपासून म्हणजेच 27 फेब्रुवारीपासून पक्ष देशभरात 1 कोटी सेल्फी मोहीम सुरू करणार आहे.

मोहिमेअंतर्गत, देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील उज्ज्वला आणि आयुष्मान लाभार्थी सेल्फी घेतील. त्याचे लोकार्पण स्वतः पंतप्रधान करणार आहेत.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष प्रचाराच्या माध्यमातून या लाभार्थ्यांशी थेट संपर्क साधून त्यांना नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांची माहिती देणार आहेत. संपूर्ण मोहीम एका अॅपशी लिंक केली जाईल, ज्यामध्ये या लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती अपलोड केली जाईल.

'सेल्फी विथ बेनिफिशरी' मोहीम पक्षाच्या महिला शाखेकडे देण्यात येणार आहे. पक्षाच्या महिला कार्यकर्त्या प्रत्येक जिल्ह्यातील उज्ज्वला योजना किंवा आयुष्मान कार्ड योजनेच्या लाभार्थ्यांना सेल्फी घेण्यासाठी आणि त्यांचे तपशील नमो अॅपमध्ये अपलोड करण्यासाठी माहिती देतील. त्यासाठी पक्षाकडून महिलांना आभासी प्रशिक्षणही दिले जात आहे.

पंतप्रधान दुपारी 4 वाजता लोकार्पण करणार

भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनिती श्रीनिवासन म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये उज्ज्वला आणि आयुष्मान योजनेची जगभरात चर्चा आहे.

महिलांना पक्षाशी जोडण्यासाठी आम्ही हे अभियान सुरू केले आहे, ज्याचा प्रारंभ खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 फेब्रुवारी रोजी करणार आहेत.

याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोमवारी महाराष्ट्रात या अभियानाचा शुभारंभ करतील. त्याचबरोबर प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांतील खासदार आणि मंत्र्यांवर हे अभियान सुरू करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

यावेळी मंत्री आणि आमदारांव्यतिरिक्त पक्षाचे कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत. दुपारी ४ वाजल्यापासून हे कार्यक्रम एकाच वेळी सुरू होतील.

प्रत्येक कार्यक्रमात किमान 500 महिलांचा सहभाग असेल

श्रीनिवासन म्हणाल्या की, प्रत्येक कार्यक्रमात किमान 500 महिला लाभार्थींचा समावेश करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सेल्फी घेण्यासाठी आणि त्यांच्या डेटाबद्दल माहितीसाठी प्रत्येक महिलेची संमती घेतली जाईल.

यासाठी पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना नमो अॅप डाउनलोड करून वापरण्यासाठी बूथ स्तरापर्यंत प्रशिक्षण देत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना देणार नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

SCROLL FOR NEXT