PM Narrendra Modi  Dainik Gomantak
देश

Mahakal Lok Corridor: 865 कोटींच्या महाकाल लोक कॉरिडॉरचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

उज्जैनमध्ये घुमला 'जय महाकाल'चा गजर; 15 फुट उंचीची शिवलिंगाची प्रतिकृती

गोमन्तक डिजिटल टीम

Mahakal Lok Corridor: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मध्यप्रदेशातील उज्जैन येथे ज्योतिर्लिंग महाकालेश्वरच्या नव्या परिसरात साकारल्या जात असलेल्या महाकाल लोक कॉरिडॉरचे लोकार्पण करण्यात आले. 865 कोटींचा हा प्रोजेक्ट आहे. या वेळी उपस्थितांनी केलेल्या जयघोषामुळे येथे 'जय महाकाल' असा एकच गजर झाला. भक्तीमय वातावरण हा कार्यक्रम पार पडला.

865 कोटींचा प्रोजेक्ट दोन टप्प्यात विकसित केला जात आहे. याद्वारे 2.8 हेक्टरचा महाकाल परिसर 47 हेक्टरचा होईल. यात 946 मीटर लांबीचा कॉरिडॉर असेल. येथूनच भाविकांना गर्भगृहात पोहचता येईल. वैदिक मंत्रोच्चारात 15 फुट उंचीच्या शिवलिंगाच्या प्रतिकृतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिमोटद्वारे अनावरण केले. अध्यात्माचा हा नजारा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते.

या लोकापर्णानंतर मोदींनी येथ झालेल्या सभेलाही संबोधित केले. कार्तिक मेला मैदानात पंतप्रधानांची सभा झाली. यावेळी कैलाश खेर यांनी स्तुतीगीत गायले. मोदी म्हणाले की, महाकाल लोकमध्ये सर्वकाही अलौकिक आहे. महाकालचा आर्शिवाद मिळाल्यावर सर्व अडचणी दूर होऊन जातात. शंकराच्या सानिध्यात अशक्य असे काहीही नाही.

तत्पुर्वी मोदींनी महाकालचे दर्शन घेतले, मंदिरात त्यांनी राष्टांग नमस्कार घातला. तसेच महाकालला सुका मेवा आणि फळांचा नैवेद्य दाखवला. सायंकाळच्या आरतीमध्येही ते सहभागी झाले. याशिवाय रुद्राक्ष माळेसह 3 मिनिट जपही केला. मोदींनी ई-व्हेईकलद्वारे या महाकाल लोकचा फेरफटकाही मारला. मोदींनी यावेळी कमल सरोवर, रुद्रसागर आणि सर्वात मोठ्या म्युरल वॉलची पाहणी

महाकाल मंदिरात यानिमित्त देशीविदेशी फुलांनी सजावट केली गेली होती. काही विशेष फुले पुणे आणि बंगळुरसह सात शहरांतून मागवली होती. दरम्यान, उज्जैन येथे रात्री हेलिकॉप्टर उतरण्याची सुविधा नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी रस्तेमार्गाने इंदुरला जातील ही शक्यता लक्षात घेऊन उज्जैन पर्यंतच्या 60 किलोमीटरच्या महामार्गावर विशेष रोषणाई केली गेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR In Goa: विधानसभा निवडणुकीपूर्वी तयारी! दुसऱ्या टप्प्यात गोव्यात होणार 'एसआयआर'; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Women's World Cup 2025: भारतीय महिला संघाला मोठा धक्का! सलामीवीर प्रतीका रावल विश्वचषकातून बाहेर

Goa electricity tariff hike: आठवड्यात दरवाढ मागे घ्या, अन्यथा...; काँग्रेस - आप शिष्टमंडळाची वीज खात्यावर धडक, आंदोलनाचा इशारा

गुगल मॅपवर विसंबला 'तो' जीप्सीसह नदीत बुडाला; फेरीधक्क्यावरुन गाडी थेट पाण्यात

Most Powerful Year: 2026 शतकातील सर्वात 'शक्तीशाली वर्ष'; सर्वांना होणार मोठा फायदा, ज्योतिषांनी दिले महत्वाचे संकेत, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT