PM Modi Dainik Gomantak
देश

PM Modi America Visit: 'चीनसोबतच्या द्विपक्षीय संबंधांसाठी सीमेवर...', पीएम मोदींचं रोखठोक मत

Manish Jadhav

PM Modi America Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या पहिल्या राजकीय दौऱ्यासाठी रवाना झाले असून ते आज रात्री न्यूयॉर्कमध्ये उतरणार आहेत. अमेरिकेत पोहोचण्यापूर्वी अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत पीएम मोदी म्हणाले की, 'अमेरिकेसोबतचे संबंध आता अधिक दृढ झाले आहेत.'

त्याचवेळी, चीनसोबतच्या (China) संबंधांवर पंतप्रधान म्हणाले की, 'चीनसोबतच्या द्विपक्षीय संबंधांसाठी सीमेवर शांतता राखणे आवश्यक आहे. सीमावाद शांततेने सोडवण्यात आला पाहिजे.'

चीनसोबतच्या सीमा विवादाबाबत पीएम मोदी म्हणाले की, 'चीनसोबत सामान्य द्विपक्षीय संबंधांसाठी सीमेवर राखणे आवश्यक आहे.

सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणे, कायद्याचे पालन करणे आणि विवाद आणि मतभेद शांततेच्या मार्गाने सोडवणे यावर आमचा नेहमीच विश्वास आहे. भारत (India) आपल्या सार्वभौमत्व आणि सन्मानाचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे तयार आणि वचनबद्ध आहे.'

वाद संवादाने सोडवावा: पंतप्रधान मोदी

ते पुढे म्हणाले की, “सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय कायदा आणि इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर केला पाहिजे. कोणत्याही प्रकारचा वाद युद्धाने जिंकण्याऐवजी 'मुत्सद्देगिरी आणि संवाद' द्वारे सोडवला गेला पाहिजे.''

दरम्यान, नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यातील संबंधांबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'जागतिक उलथापालथीमध्ये भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले योग्य स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याने दोन्ही देशांमधील संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले आहेत.'

ते पुढे म्हणाले की, 'भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांमध्ये "अद्भुत विश्वासाची" स्थिती निर्माण झाली आहे.'

तसेच, दोन्ही देशांमधील वाढते संरक्षण सहकार्य हा आमच्या भागीदारीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे पंतप्रधान मोदींनी अमेरिकन मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. हे केवळ एवढ्यापुरते मर्यादित नाही तर व्यापार, तंत्रज्ञान आणि ऊर्जा यापुरतेही त्याचा विस्तार आहे.

पंतप्रधान मोदींनी UNSC मधील बदलावरही भाष्य केले

वॉशिंग्टनला आपल्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर गेलेले पीएम मोदी म्हणाले की, भारत देखील येथे आपली विविधता साजरी करतो. मोदी म्हणाले की, “हजारो वर्षांपासून, भारत ही अशी भूमी आहे, जिथे सर्व धर्म लोक शांततेने राहतात. जगातील प्रत्येक धर्माचे लोक येथे तुम्हाला आढळतील जे एकमेकांशी एकोप्याने राहतात.''

युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल (UNSC) मध्ये अनेक दिवसांपासून बदलांची मागणी केली जात आहे, भारत स्वतः कायम सदस्यत्वाची मागणी करत आहे. यूएनएससीमधील बदलाबाबत पीएम मोदी म्हणाले की, यूएनएससीचे सध्याचे सदस्यत्व बदलले पाहिजे आणि भारताला तिथे ठेवायचे आहे का, हा प्रश्न जगाला विचारला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT