PM Modi Dainik Gomantak
देश

PM Modi: पंतप्रधान मोदी देशाला करणार संबोधित! महिला आरक्षण विधेयक रद्द झाल्यानंतर घेणार मोठी भूमिका?

PM Modi Address to Nation Tonight: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (18 एप्रिल) रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्या या संबोधनाकडे लागले आहे.

Manish Jadhav

PM Modi Address to Nation Tonight: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (18 एप्रिल) रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष त्यांच्या या संबोधनाकडे लागले आहे. विशेष म्हणजे, लोकसभेत विरोधकांच्या अडथळ्यामुळे 'महिला आरक्षण विधेयक' मंजूर होऊ शकले नाही, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे संबोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. महिलांना राजकारणात हक्काचे स्थान देण्यासाठी आणलेले हे ऐतिहासिक विधेयक संसदेत रोखले गेल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला. अशा तणावपूर्ण वातावरणात पंतप्रधान मोदी जनतेसमोर नेमकी कोणती भूमिका मांडतात, यावर आता राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

पंतप्रधानांनी जेव्हा जेव्हा रात्रीच्या वेळी देशाला संबोधित केले आहे, तेव्हा त्याचे दूरगामी परिणाम झाले आहेत. आजच्या संबोधनात पंतप्रधान महिला आरक्षण विधेयकावरुन विरोधकांच्या भूमिकेचा समाचार घेण्याची शक्यता आहे. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी उचललेले हे पाऊल कोणत्या कारणांमुळे अडकले, हे सांगतानाच पंतप्रधान या मुद्द्यावरुन देशव्यापी मोहिमेची किंवा एखाद्या मोठ्या धोरणात्मक निर्णयाची घोषणा करु शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. विरोधकांच्या विरोधानंतरही सरकार या विधेयकावर ठाम असल्याचे आणि भविष्यात कोणती पावले उचलणार, याचे संकेत या भाषणातून मिळण्याची दाट शक्यता आहे.

संसदेतील घडामोडी पाहता हा विषय महिलांच्या हक्काशी संबंधित असेल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. लोकसभेतील या धक्कादायक घडामोडींनंतर पंतप्रधानांचे संबोधन जनतेपर्यंत थेट संवाद साधून आपली बाजू प्रभावीपणे मांडण्याचा एक प्रयत्न असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रात्री 8:30 वाजता होणाऱ्या या भाषणाचे थेट प्रक्षेपण सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केले जाणार आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देशात नवा राजकीय संघर्ष उभा ठाकणार की सरकार काही मोठा मास्टरस्ट्रोक खेळणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT