PM Modi Meeting  Dainik Gomantak
देश

'कोरोना विरोधात लस हेच कवच'; पंतप्रधान मोदींचे राज्यांना मोठे आवाहन

PM Modi Meeting With All State CM: कोरोना विषणूचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज ऑनलाईन संवाद साधला आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन बैठक घेतली. यावेळी पंतप्रधानानी अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. त्यांनी कोरोना, पेट्रोल-डिझेल, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. यामुळे वयोगटानुसार सर्व नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे ही आमची प्राथमिकता असावी. तसेच आपल्याला पूर्वीप्रमाणेच शाळांमध्येही विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. गेल्या 24 तासात भारतात कोरोनाचे 2,927 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1,204 प्रकरणे दिल्लीतील आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरातून 2252 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 32 जणांचा मृत्यू झाला आहे, असे मोदी यांनी सांगितले.

काही राज्यांनी कर कमी केले. मात्र इतरांनी ते केले नाही. त्यामुळे या राज्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव अधिक आहेत. ज्या राज्याने करामध्ये कपात केली आहे, त्यांचे नुकसान होते. काही राज्यांनी आपल्या नागरिकांसाठी करामध्ये कपात केली आहे. त्याचा दिलासा नागरिकांना मिळाला आहे. कर्नाटक आणि गुजरात सोडून इतर राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केलेले नाहीत, असे मोदी यांनी बैठकीत बिगर भाजप सरकार असलेल्या राज्यांना आठवण करुन दिली आहे. तुमच्या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी प्रार्थना करित आहे. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, झारखंड, आंध्र प्रदेश या सारख्या राज्यांनी पेट्रोल-डिझेल कर कपातीबाबत काहीच केलेले नसल्याचे मोदी म्हणाले. देश हितासाठी गेल्या नोव्हेंबरमध्ये जे करणे आवश्यक होते. ते आता करुन नागरिकांना दिलासा द्यावा. जागतिक संकटाच्या काळात सहकारी संघराज्यात टीम म्हणून काम करायला हवे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी राज्यांना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT