प्रेयसीच्या मदतीने पत्नीची काटा काढला, दारु पाजून केली हत्या

पोलिसांना तरुणीचा मृतदेह झुडपात आढळून आल्याने त्यांना धक्का बसला. काही पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली.
Murder Case
Murder CaseDainik Gomantak

चेन्नई: 23 एप्रिल रोजी, तामिळनाडूच्या श्रीपेरंबदुरम येथील थेरेसापुरम भागात एका महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. पोलिसांनी तिची 22 वर्षीय प्रिया अशी ओळख पटवली. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मृताचा 25 वर्षीय पती नवीन कुमार याच्याकडे चौकशी केली असता त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिली.

(Murder of wife with the help of his girlfriend)

Murder Case
तामिळनाडूत रथोत्सवादरम्यान मोठा अपघात! विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, 15 जखमी

चौकशीत जे समोर आले ते अतिशय धक्कादायक आहे. आरोपी नवीन कुमारने पोलिसांना सांगितले की, जेव्हा त्याच्या पत्नीने मृत मुलाला जन्म दिला आणि नंतर प्रियाला वेश्याव्यवसायाचा आरोप करून वेगळे केले तेव्हा तो नाराज झाला होता. यानंतर तो घटस्फोटित महिला कल्पनासोबत राहू लागला.

हाती अलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन आणि कल्पना जेव्हा एकत्र राहू लागले तेव्हा प्रियाला हे आवडले नाही. या दोघांची परिसरात प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की अलीकडे प्रियाने पोलिसांना कल्पनाबद्दल माहिती दिली होती की ती गांजाची तस्करी करते. पोलिसांनी तपास केला असता प्रियाचे म्हणणे खरे ठरले आणि कल्पना आणि तिच्या भावाला गांजाच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

Murder Case
एबीजी शिपयार्ड बँक फसवणुकीत 'ईडी'ची मुंबई पुणे आणि सुरत येथे छापेमारी

पतीने गर्लफ्रेंडसोबत प्लॅन बनवला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीनने चौकशीदरम्यान सांगितले की, कल्पना जेव्हा जामिनावर तुरुंगातून बाहेर आली तेव्हा दोघांनी प्रियाला संपवण्याची योजना आखली. योजनेनुसार, 22 एप्रिल रोजी नवीनने प्रियाला चिन्ना कांचीपुरम येथील टीचर्स कॉलनी येथील घरात बोलावले आणि तेथे त्याने तिला दारू पाजली.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ही पद्धत अवलंबली

प्रिया दारूच्या नशेत असताना संधी साधून नवीन आणि कल्पना यांनी दुपट्ट्याने तिचा गळा आवळून खून केला. यानंतर तिचा मृतदेह दुचाकीवर अशा प्रकारे ठेवण्यात आला की, वाटेत असलेल्या लोकांना आणि पोलिसांना तीन जण बाईकवर स्वार असल्याचे वाटले आणि त्यानंतर 40 किलोमीटरहून अधिक प्रवास करून प्रियाचा मृतदेह झुडपात फेकून दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com