PM Narendra Modi
PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

PM Modi Interview: ‘’पाच वर्षे राजकारण करु नये’’: पंतप्रधान मोदींची बेधडक मुलाखत; प्रत्येक प्रश्नांची दिली दिलखुलास उत्तरे

Manish Jadhav

PM Modi Interview: लोकसभा निवडणुकीतील चार टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. मतदानाचे तीन टप्पे अद्याप बाकी आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणूक प्रचार सभा, रोड शो यांचा धडाका लावला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आजतकशी’ खास संवाद साधला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची अगदी दिलखुलास उत्तरे दिली. विरोधकांच्या नॅरेटिव्हवर पंतप्रधान मोदी मोकळेपणाने बोलले. चला तर मग पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मुलाखतीविषयी सविस्तर जाणून घेऊया...

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांशी जो मंत्र शेअर केला होता, त्याबद्दलही मुलाखतीत खुलेपणाने सांगितले. पंतप्रधान म्हणाले की, ‘’त्यांनी पक्ष नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना वर्षभरापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्यास सांगितले होते. त्यासाठी त्यांनी उमेदवारांची घोषणा होण्याची वाट पाहू नये.’’

पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की, ‘’वर्षापूर्वी एका सभेत मी माझ्या पक्षाला सांगितले होते की, उमेदवारांची जाहीर होण्याची वाट पाहू नका. तुमचा उमेदवार जाहीर झाला आहे, जो कमळ (भाजपचे निवडणूक चिन्ह) आहे."

भाजपच्या महत्त्वाकांक्षी "400 पार" च्या घोषणेबाबत आणि त्यामागील तर्काबद्दल सांगताना पंतप्रधान मोदींनी शाळेत शिकत असणाऱ्या मुलाचे उदाहरण यावेळी दिले. पंतप्रधान म्हणाले की, ‘’प्रत्येक परिक्षेत मुलाने चांगली कामगिरी करावी असे प्रत्येक आई-बापाला वाटते. याचेच साधर्म्य मी मांडले. तुम्हाला तुमच्या मुलाने 90 टक्के गुण मिळवले, तर पुढच्या वेळी मुलाने 95 टक्के गुण मिळवले पाहिजेत अशी अपेक्षा आपण करतो की नाही? पुढे जर मुलाने परिक्षेत 99 टक्के गुण मिळवले तर त्याने 100 टक्के मिळवले पाहिजेत अशी अपेक्षा आपण करतोच ना...’'

“2019 पासूनच आम्ही भाजप आणि एनडीए म्हणून 400 पार ची तयारी सुरु केली होती. तर मग पक्ष कार्यकर्त्यांना सांगणे हे माझे कर्तव्य आहे की आपल्याला 400 च्या पुढे जायचे आहे,” असेही पंतप्रधान मोदींनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी यांनी पुढे सांगितले की, ‘’भाजपची सत्ता कायम राहील, अशी जगालाही खात्री आहे. मला रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा सप्टेंबरच्या बैठकीच्या निमंत्रणासाठी फोन आला होता. G-7 देशांकडूनही फोन आला. जगालाही पूर्ण विश्वास आहे की, पुन्हा एकदा आमचेच सरकार स्थापन होणार आहे.’’

मुलाखतीदरम्यान पंतप्रधान मोदींना समान नागरी संहितेबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. प्रश्नाचे उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, ‘’विरोधकांना विचारले पाहिजे की त्यांनी समान नागरी संहितेबद्दल जाणून घेतले आहे का? UCC म्हणजे काय? गोव्यात यूसीसी आहे. मला सांगा, गोव्यातील लोक एकसारखे कपडे घालतात का? गोव्यातील लोक एकाच प्रकारचे अन्न खातात का? विरोधकांनी समान नागरी संहितेबद्दल काय चेष्टा लावली आहे.’’

दरम्यान, भाजपच्या राजवटीत लोकशाही धोक्यात आल्याच्या विरोधकांच्या दाव्यावर पंतप्रधान मोदींनी खरपूस समाचार घेतला. मोदी म्हणाले की, ‘’काँग्रेससाठी लोकशाही म्हणजे केवळ सत्तेत असणे असा होतो. काँग्रेस परिवाराचे दुर्दैव आहे की, ते सत्तेत असतील तरच देशात लोकशाही राहील. आजही ते हे मान्य करायला तयार नाहीत की 2014 पासून देशाने आम्हाला दुसऱ्यांदा निवडून दिले आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या मुद्द्यांची आम्ही अंमलबजावणी केली तरी त्यांना वाईट वाटते.”

केंद्र सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांबद्दल विचारले असता, पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘’आज विरोधी पक्ष ज्या कायदे आणि एजन्सींवर टीका करतात ते काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातही होते, परंतु ते प्रभावीपणे काम करत नव्हते. 2004-2014 पर्यंत व्यवस्था आणि कायदा समान होता. मी कायदा केला नाही. मी ईडीही तयार केली नाही.’’

'एक निवडणूक, एक पक्ष' लागू करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "सत्तेत आल्यानंतर कोणत्याच पक्षाने पाच वर्ष राजकारण करु नये. मी नेहमीच म्हणतो की निवडणुका फक्त तीन किंवा चार महिन्यांसाठीच घ्याव्यात. राजकारण पाच वर्षांसाठी केले जाऊ नये. सततच्या निवडणुकांमुळे मोठ्याप्रमाणात लॉजिस्टिक खर्च होतो."

मुलाखतीदरम्यान एक मोठा खुलासा करताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ‘’रमजानच्या पवित्र महिन्यात गाझामध्ये बॉम्ब हल्ले थांबवण्याचे आवाहन करण्यासाठी मी इस्रायलला दूत पाठवला होता. त्याला इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना कळवायला आणि समजावून सांगायला सांगितले होते की किमान रमजानच्या पवित्र महिन्यात गाझामध्ये बॉम्ब हल्ले करु नये. त्यानंतर त्यांनी (इस्रायल) शेवटी दोन-तीन दिवस युद्ध थांबवले होते. इथे तुम्ही मला मुस्लीम मुद्द्यावरुन कोंडीत पकडत आहात, पण मी त्याचा कधी प्रचार केला नाही. जगातील अन्य काही देशांनी देखील रमजानच्या पवित्र महिन्यात युद्ध थांबावे यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. यादरम्यानच मीही प्रयत्न केला होता.’’

पंतप्रधान मोदी शेवटी म्हणाले की, ‘’लोकसभा निवडणुकीदरम्यान श्रीनगरमध्ये शांततेत मतदान झाले हे आमचे सर्वात मोठे यश आहे. या संपूर्ण निवडणुकीत माझ्यासाठी श्रीनगरमधील शांततेत पार पडलेले मतदान हा सर्वात मोठा समाधानाचा क्षण होता. मी धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही आणि माझे सरकारही भेदभाव करत नाही, हे आम्ही पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: कोलवा PSI ची महिलेला मारहाण, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची पहिली प्रतिक्रिया

Pernem News: रस्त्यावर गटारातले सांडपाणी, खड्डे आणि वाढलेली झाडेझुडपे; हद्दीच्या वादात पेडणेवासीयांच्या डोक्याला ताप

Margao News: उच्‍च न्‍यायालयाने आदेश देऊनही थर्माकाेलच्‍या राशी तशाच

11000000000 कोटींची डील! बाबा रामदेव यांच्या पतंजलीबाबत मोठी अपडेट; कोण विकत घेतय दंत आणि केश कांती?

Tiracol Village: गोवा मुक्तीनंतर तेरेखोलमध्ये हे पहिल्यांदाच घडतंय; आता महाराष्ट्रावर अवलंबून रहावे लागणार नाही

SCROLL FOR NEXT