PM Modi Mental Naxalism Statement Dainik Gomantak
देश

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Intellectual Naxals Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये ‘बौद्धिक नक्षली’ असा उल्लेख केल्याने विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये ‘बौद्धिक नक्षली’ असा उल्लेख केल्याने विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. तर, सरकारने हा शब्दप्रयोग विरोधी नेत्यांना उद्देशून नव्हता, अशी सारवासारव केली आहे.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ‘एक्स’वर तीन मुद्द्यांची यादी देत, ‘बौद्धिक नक्षलीं’ची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये नक्षलवादविरोधी मोहिमेचा उल्लेख करताना, ‘‘बौद्धिक नक्षलवाद्यांची ओळख पटवून त्यांना जनतेने रोखायला हवे,’’ असे आवाहन केले होते. त्यावर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी टिका केली आहे. माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘बौद्धिक नक्षलवादी असल्याचा मला अभिमान आहे’ असे विधान करत प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधानांचे ‘बौद्धिक नक्षली’ विधान हे निव्वळ राजकीय स्वरूपाचे वक्तव्य असल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे. यापूर्वी जेव्हा सरकारमधील लोकांकडून राजकीय विरोधकांना शहरी नक्षली संबोधले होते, तेव्हा गृहमंत्री अमित शहा यांना अशी कोणतीही अधिकृत कायदेशीर व्याख्या अस्तित्वात नसल्याचे सांगावे लागले होते.

‘‘जातिनिहाय जनगणनेची मागणी करणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांनी शहरी नक्षली म्हटले होते, त्यानंतर खुद्द सरकारने काही दिवसांनंतर स्वतः जातिनिहाय जनगणनेची घोषणा केली होती,’’ असे रमेश यांनी सांगितले. ‘मी आणि सर्व कॉक्रोचही ‘बौद्धिक नक्षली’ आहोत,’ अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी दिली आहे.

तर, केवळ सरकारला प्रश्न विचारतात, म्हणून तुम्ही सुशिक्षित तरुणांना नक्षलवादी म्हणणार का, असा सवाल कॉक्रोच जनता पक्षाचा प्रवक्ता सौरभ दास याने केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना ‘बौद्धिक नक्षली’ असे म्हटलेले नाही, असे किरेन रिजीजू यांनी म्हटले आहे.

रिजीजू यांची ‘बौद्धिक नक्षलीं’ची व्याख्या

नक्षलवाद्यांना पाठिंबा देणारे आणि राज्यघटना नाकारणारे

फुटीरतावाद्यांच्या पाठिशी उभे राहणारे व ३७०व्या कलमाला पाठिंबा देणारे

ईशान्य भारत देशापासून वेगळा करण्यासाठी ‘चिकन नेक’पासून हा प्रदेश तोडण्याची इच्छा असणारे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT