PM Modi On Operation Sindoor Dainik Gomantak
देश

PM Modi: ''मोदीचा सामना करणं किती कठीण आहे याचा दहशतवाद्यांनी...''; गुजरातमधून पीएम मोदी गरजले

PM Modi On Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार (26 मे) आणि मंगळवारी (27 मे) गुजरात दौऱ्यावर आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच गुजरात दौरा आहे. पंतप्रधान सकाळी वडोदरा येथे पोहोचले.

Manish Jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार (26 मे) आणि मंगळवारी (27 मे) गुजरात दौऱ्यावर आहेत. ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच गुजरात दौरा आहे. पंतप्रधान सकाळी वडोदरा येथे पोहोचले. यानंतर, त्यांच्या हस्ते दाहोद येथे 9000 अश्वशक्तीच्या इंजिन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी दाहोदमध्ये एका जाहीर सभेला संबोधितही केले. त्यांनी भाषणादरम्यान पहिल्यांदा गुजरातच्या जनतेचे अभिवादन केले. पंतप्रधानांनी येथेही आपल्या भाषणात 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'दाहोदमध्येही ऑपरेशन सिंदूरसाठी माता आणि बहिणींनी आपले बलिदान दिले. महर्षी दधीचींनी दाहोदमध्ये देह सोडला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो काही नरसंहार केला त्यानंतर त्यांना मोदी गप्प राहील असे वाटले का? जो कोणी अशाप्रकारची हरकत करले त्याला मोदी अजिबात सोडणार नाही. हे केवळ एक ऑपरेशन नाही. मोदीचा सामना करणे किती कठीण जाणार याची एक ट्रायल आहे. यापुढेही दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल अशी अद्दल घडवली जाईल. पहलगाममध्ये निष्पाप लोकांना मारण्यात आले. ते पाहून माझेही रक्त सळसळले होते. म्हणूनच त्यांना अद्दल घडवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले.'

मोदी पुढे म्हणाला की, 'आपल्या शूरविरांनी जे केले ते यापूर्वी जगाने कधीही पाहिले नव्हते. आपल्या बहादूर सेनेने अवघ्या 22 मिनिटांत शत्रू देशात घुसून धडक कारवाई केली. त्यानंतर जेव्हा पाकिस्तानने भ्याड हल्ले करण्यास सुरुवात केली तेव्हाही आपल्या शूरविरांनी त्यास चोख प्रत्युत्तर दिले. फाळणीनंतर जन्माला आलेल्या या देशाचा भारताला हानी पोहोचवणे एवढाच उद्देश आहे.'

भारत जगाला निर्यात करतो

तसेच, भारताच्या आर्थिक प्रगतीबाबतही पंतप्रधान आपल्या भाषणादरम्यान बोलले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''देशाला आवश्यक असलेल्या वस्तूंचे उत्पादन असो किंवा आपल्या देशात बनवलेल्या वस्तूंची जगातील विविध देशांमध्ये निर्यात असो, भारताची निर्यात सातत्याने वाढत आहे. आज आपण जगभरातील देशांमध्ये स्मार्ट फोनपासून ते वाहने, खेळणी, लष्करी शस्त्रे आणि औषधे अशा वस्तू निर्यात करत आहोत. आज भारत (India) केवळ रेल्वे, महानगरे आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानच तयार करत नाही तर ते जगाला निर्यात देखील करतो. आपले दाहोद हे याचे जिवंत उदाहरण आहे.''

गुजरात रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण पूर्ण

पंतप्रधान शेवटी म्हणाले की, ''काही दिवसांपूर्वीच येथे हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन झाले होते. यापैकीच एक सर्वात भव्य प्रकल्प म्हणजे दाहोदची इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह फॅक्टरी. मी 3 वर्षांपूर्वी येथे त्याची पायाभरणी करण्यासाठी आलो होतो. आता या कारखान्यात पहिले इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह तयार झाले आहे. आज गुजरातने (Gujrat) आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गुजरातच्या 100 टक्के रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT