PM Modi: 'वेळ आणि टार्गेट भारतीय सेनेने ठरवावे'; दहशतवादाविरुद्ध मोदींनी सांगितली भारताची त्रीसूत्री

Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. बिकानेर येथून पंतप्रधानांनी पाकड्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरचे त्यांनी तोंडभरुन कौतुक केले.
PM Modi
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. बिकानेर येथून पंतप्रधानांनी पाकड्यांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात राबवलेल्या यशस्वी ऑपरेशन सिंदूरचे त्यांनी तोंडभरुन कौतुक केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी पाकिस्तानला खुले आव्हान देखील दिले. पंतप्रधान म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी त्रीसूत्री तयार केली आहे. त्यापैकी पहिले सूत्र म्हणजे जर भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर भारत गप्प बसणार नाही, त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाईल. प्रत्युत्तर देण्याची वेळ आणि टार्गेट भारतीय लष्कराने निवडले पाहिजे.

ऑपरेशनच्या दुसऱ्या सूत्राबाबत सांगताना पंतप्रधान म्हणाले की, दुसरे सूत्र म्हणजे- भारत अणुबॉम्बच्या धमकीला घाबरणार नाही. याचा सरळ अर्थ असा की, पाकिस्तान सातत्याने भारताला (India) अणुबॉम्बची धमकी देत आला. पण यापुढे पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला जशास तसे उत्तर दिले जाईल.

PM Modi
India-Turkey Relations: पाकड्यांना पाठिंबा देणाऱ्या तुर्कीची भारताने उतरवली मस्ती; दोन दिवसांत तब्बल 2,500 कोटींचा फटका!

तिसरे सूत्र काय?

ऑपरेशन सिंदूरच्या तिसऱ्या सूत्राबाबत सांगताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानला (Pakistan) उघडपणे इशारा दिला. पंतप्रधान म्हणाले की, तिसरे सूत्र म्हणजे आपण दहशतवादाचे सूत्रधार आणि दहशतवादाला आश्रय देणारे सरकार यांना वेगळे म्हणून पाहणार नाही.

PM Modi
India Pakistan Tension: म्हणे, S-400 सिस्टिम उद्ध्वस्त केली, पाकड्यांचं खोटं पुन्हा भारतानं पकडलं; PM मोदींनी फोटो केले शेअर

पहलगाम हल्ल्याची आठवण

यावेळी पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याच्या आठवणीला उजाळा दिला. पंतप्रधान म्हणाले की, 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना धर्म विचारुन मारले. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी नि:शस्त्र 26 लोकांना मारले. पंतप्रधान पुढे म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, पण त्या गोळ्या 140 कोटी देशवासीयांच्या छातीत घुसल्या. यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाने एकजूट होऊन दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा संकल्प केला. आपल्या बहादूर सेनेने दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा मोठी शिक्षा दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com