Prime Minister Narendra Modi was honored with the Order of the Druk Gyalpo Dainik Gomantak
देश

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींना मिळाला भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान; ठरले पहिले विदेशी नेते

Order of the Druk Gyalpo: भूतानच्या राजाने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो' देऊन सन्मानित केले. हा भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

Manish Jadhav

Prime Minister Narendra Modi was honored with the Order of the Druk Gyalpo: भूतानच्या राजाने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो' देऊन सन्मानित केले. हा भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले विदेशी नेते ठरले आहेत. भूतानमध्ये 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो' सन्मानाला खूप महत्त्व आहे. हा सन्मान उत्कृष्ट कामगिरी आणि आयुष्यभर समाजासाठी काम केल्याबद्दल दिला जातो. भूतानच्या स्थापनेपासून आतापर्यंत हा पुरस्कार केवळ चार मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.

हा सन्मान फक्त चार जणांना मिळाला आहे

दरम्यान, 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्यालपो' पुरस्कार मिळालेल्यांमध्ये भूतानची राणी आशी केसांग चोडेन वांगचुक यांचा समावेश आहे. 2008 मध्ये जे थ्रीझूर तेन्झिन डेंडुप (भूतानचे 68 वे जे खेंपो) आणि 2018 मध्ये जे खेंपो ट्रुलकु नगावांग जिग्मे चोएड्रा यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. जे खेंपो हे भूतानच्या केंद्रीय मठाचे मुख्य मठाधिपती आहेत.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर

भूतानच्या दोन दिवसीय दौऱ्याची सुरुवात करुन पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी थिम्पू येथे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली. भूतानच्या राजाला भेटण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. नेबरहुड फर्स्ट धोरणांतर्गत भूतानशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी दोन दिवसीय दौऱ्याची सुरवात केली. त्यांच्या आगमनानंतर काही तासांनी पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'त्यांचे अतिशय संस्मरणीय स्वागत करण्यात आले. भूतानी जनतेचे आभार.' भारत-भूतान मैत्री यापुढेही नवीन उंची गाठेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: रात्री-अपरात्री पोलिस धडकणार घरी! 'गोव्या'त गुन्हेगारांवर करडी नजर; आठ दिवसांत १०५ जणांची चौकशी

Goa Crime: 'पूजा नाईक'च्या ताब्यातील आणखी चार कारगाड्या जप्त! म्हार्दोळ पोलिसांनी आवळल्या 'एजंट'च्या मुसक्या

Kalasa Banduri Project: 'कळसा-भांडुरा'बाबतीत कर्नाटकच्या अडचणी वाढल्या! आता ‘प्रवाह'च्या बैठकीकडे लक्ष

Rashi Bhavishya 25 October 2024: शत्रूंपासून सावधान! प्रवासादरम्यान होऊ शकते मोठी फसवणूक; जाणून घ्या काय सांगतयं या राशीचं भविष्य

अन्.. विठूरायाच्या दर्शनाचे स्वप्न राहिले अपुरे..! डिचोलीच्या बाजारात कोसळून वृद्धा मृत्यूमुखी

SCROLL FOR NEXT