PM Modi: काश्मीरबाबत गरळ ओकल्यानंतरही पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना पीएम मोदींकडून शुभेच्छा

Pakistan PM: नॅशनल असेंब्लीच्या सदस्यांसमोरील विजयी भाषणात ते म्हणाले होते, 'चला आपण एकत्र येऊ आणि पॅलेस्टिनी आणि काश्मिरींच्या स्वातंत्र्यासाठी ठराव मंजूर करू.'
Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi Congratulates Pakistan PM Shehbaz Sharif:

पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वजनिक निवडणुकीनंतर पीएमएल-एन आणि पीपीपी या पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. यामध्ये पीएमएल-एन पक्षाचे नेते शेहबाझ शरीफ यांनी पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शेहबाज शरीब यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट लिहून शेहबाज शरीफ यांचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींनी शेहबाज शरीफ यांना टॅग करत म्हटले की, "पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्याबद्दल शेहबाज शरीफ यांचे अभिनंदन."

पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा अशा वेळी आला आहेत, जेव्हा शरीफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याच्या एक दिवस आधी काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

नॅशनल असेंब्लीच्या सदस्यांसमोरील विजयी भाषणात ते म्हणाले होते, 'चला आपण एकत्र येऊ आणि पॅलेस्टिनी आणि काश्मिरींच्या स्वातंत्र्यासाठी ठराव मंजूर करू.'

शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. 'ऐवान-ए-सद्र' (राष्ट्रपती भवन) येथे आयोजित समारंभात राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

Pakistan PM Shehbaz Sharif
China Army Budget: चीनी लष्कराच्या बजेटमध्ये प्रचंड वाढ, अमेरिकेनंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर

शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत.

यापूर्वी 2022 मध्ये शेहबाज शरीफ पहिल्यांदाच पंतप्रधान झाले होते. ते देशाचे 24 वे पंतप्रधान आहेत. आपल्या देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असताना शरीफ यांनी पाकिस्तानची कमान हाती घेतली आहे. याआधी ते एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2023 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते.

Pakistan PM Shehbaz Sharif
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे 117 व्या वर्षात पदार्पण, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने दिल्या खास शुभेच्छा

24वे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर लगेचच नॅशनल असेंब्लीमधील विजयी भाषणात शेहबाझ शरीफ यांनी त्यांचे मोठे बंधू तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या नवाझ शरीफ आणि मित्रपक्षांचे आभार मानले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com