PM Modi Dainik Gomantak
देश

PM Modi: ''संदेशखळीच्या गुन्हेगारांना सोडले जाणार नाही...'', बंगालच्या कूचबिहारमध्ये PM मोदींचा टीएमसीवर हल्लाबोल

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे.

Manish Jadhav

Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. याचदरम्यान, पंतप्रधान मोदींनी आज पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये एका प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, ''सर्वप्रथम मी ममता दीदींचे आभार मानू इच्छितो. 2019 मध्ये मी या मैदानावर रॅलीला संबोधित करण्यासाठी आलो होतो, त्यावेळी त्यांनी मैदानाचा आकार कमी करण्यासाठी मधोमध स्टेज बांधले होते, त्यावेळी मी म्हटलं होतं की जनता त्यांना उत्तर देईल. यावेळी ममता दीदींनी कोणताही अडथळा निर्माण केला नाही आणि आज मला तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली.''

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ''गेल्या 10 वर्षात झालेला विकास हा केवळ ट्रेलर आहे. माझे विरोधक म्हणतात की मोदींना कुटुंब नाही, पण मोदीसाठी माझा भारत माझा परिवार आहे. दरम्यान, संदेशखळीच्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी कशाप्रकारचे प्रयत्न केले गेले हे संपूर्ण बंगालने आणि देशाने पाहिले. आता तुरुंगात त्यांना बाकिचे आयुष्य काढावे लागणार हे निश्चित आहे.''

पंतप्रधान मोदी पुढे असेही म्हणाले की, ''मी म्हणतोय भ्रष्टाचार हटओ, तर विरोधक म्हणतात भ्रष्टाचारियों को बचाओ. भाजप सरकारने नागरिकत्व कायदा आणला, परंतु इंडिया आघाडीचे लोक या कायद्याबाबत खोटा प्रचार करत आहेत. टीएमसी, डावे आणि काँग्रेस मोदी विरोधी राजकारण करतायेत. बंगालचा हा मूड संपूर्ण देश पाहत आहे. भाजप सरकार सर्वसामान्यांसाठी काम करते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने नवनवीन योजना राबवल्या. नमो दीदी योजनेंतर्गत माता-भगिनींना बहिणींना ड्रोन देण्यात आले.''

लोकसभा निवडणुकीत भाजपने संदेशखळी प्रकरणातील पीडिता रेखा पात्रा यांना बशीरहाट मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यानंतर रेखा पात्रा यांच्याविरोधात काही ठिकाणी पोस्टरही पाहायला मिळाले. त्याचवेळी, पीएम मोदींनी रेखा पात्रा यांच्याशीही फोनवरुन चर्चा केली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्याकडून निवडणुकीची तयारी, भाजपला जनतेचा पाठिंबा आणि इतर विषयांची माहिती घेतली होती. रेखा पात्रा यांनी संदेशखळीतील महिलांना येणाऱ्या अडचणी पंतप्रधान मोदींना सांगितल्या. यावेळी पीएम मोदींनी रेखा पात्रा यांचे 'शक्तिस्वरुपा' असे वर्णन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT