PM Modi,  Amit Shah Sonia Gandhi met LokSabha Speaker Om Birla today.
PM Modi, Amit Shah Sonia Gandhi met LokSabha Speaker Om Birla today. Dainik Gomantak
देश

'मिले सुर मेरा तुम्हारा',मोदी,शाहा,गांधी एकत्र

दैनिक गोमन्तक

लोकसभा (Parliament) अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्यानंतर आज सभापती ओम बिर्ला (Om Birla) यांनी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Home Minister Amit Shah), काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी (Saniya Gandhi) आणि काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी उपस्थित होते.विशेष म्हणजे, पावसाळी अधिवेशनासाठी (Monsoon Session) लोकसभेची बैठक बुधवारी रद्द करण्यात आली. पेगासस हेरगिरी प्रकरण (Pegasus Spyware Issue), तीन केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची मागणी आणि सभागृहात केवळ 22 टक्के कामकाज यासह विरोधी पक्षांनी केलेल्या गोंधळामुळे संपूर्ण अधिवेशन विस्कळीत झालेले पाहायला मिळाल. (PM Modi, Amit Shah Sonia Gandhi met LokSabha Speaker Om Birla today.)

लोकसभा कामकाज तहकूब केल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात ही बैठक झाली. सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरीही सभापती बिर्ला यांना भेटण्यासाठी आले. याशिवाय तृणमूल काँग्रेस, अकाली दल, वायएसआरसीपी, बिजू जनता दल यासह अनेक विरोधी पक्षांचे नेतेही सभापती बिर्ला यांना भेटण्यासाठी पोहोचले होते.

या बैठकीत लोकसभा अध्यक्षांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना भविष्यात सभागृहात चर्चा आणि संवादाला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करत चर्चा आणि संवादातूनच जनतेचे कल्याण होईल असे सांगत जनतेचे प्रश्न केवळ चर्चेनेच दूर होऊ शकतात असे मत मांडले आहे .

लोकसभा अध्यक्ष म्हणाले, "सतत चाललेल्या गोंधळामुळे यावेळी संसदेचे कामकाजात केवळ 22 टक्केइतकेच काम होऊ शकले आहे." तसेच या अधिवेशनादरम्यान संविधानातली 127 वी सुधारणा विधेयकासह एकूण 20 विधेयके मंजूर करण्यात आली आहेत . तसेच या अधिवेशनात चार नवीन सदस्यांनी शपथ घेतली असून एक ६६ महत्वाचे प्रश्न चर्चेसाठी घेण्यात आले आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी लोकसभेत विरोधकांना बोलू दिले जात नाही असा आरोप केला होता या आरोपालाही त्यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मी प्रत्येकाला बोलण्याची संधी देतो. काहीही झाले तरी. मी बराच वेळ संसद चालवतो जेणेकरून प्रत्येकजण बोलू शकेल, पण संसद चालवायला परवानगी नसेल तर ते कसे होईल.अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

काल राज्यसभेत घडलेल्या घटनेवरहि ओम बिर्ला यांनी भाष्य केले आहे "मला दुसऱ्या सभागृहाबद्दल भाष्य करायचे नाही, पण मला एवढे सांगायचे आहे की, जर सभा व्यवस्थित चालली नाही तर कोणताही अध्यक्ष नक्कीच नाराज होईल. खासदारांनी संसदेची प्रतिष्ठा जपली नाही तर कोणीही नाराज होईल." असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT