उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना राज्यसभेतच अश्रू अनावर

काल घडलेल्या घटनेची उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) यांनी निंदा केली आहे.
Vice President Venkaiah Naidu gets emotional in Rajya Sabha
Vice President Venkaiah Naidu gets emotional in Rajya SabhaTwitter @ANI
Published on
Updated on

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा (Parliament Monsoon Session) शेवटचा आठवडा दिल्लीत सुरु आहे. हे अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजताना पाहायला मिळत आहे. अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरत विरोधी पक्षांनी संसदेत अभूतपूर्व गोंधळ घातलेला पाहायला मिळाला. आणि याचमुळे लोकसभेचं (Loksabha) कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. तर काल राज्यसभा (Rajyasabha) सभापतींवर पुस्तक भिरकावल्याची घटनाही राज्यसभेत घडली आहे. आणि काल घडलेल्या याच घटनेची उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) यांनी निंदा केली आहे. (Vice President Venkaiah Naidu gets emotional in Rajya Sabha)

राज्यसभेत विरोधकांकडून घालण्यात आलेल्या या साऱ्या गोंधळामुळे सभापती व्यंकय्या नायडू भावूक झालेले पाहायला मिळाले . व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांच्या गोंधळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. राज्यसभेत मंगळवारी पेगॅसस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातला आहे .

काल राज्यसभेत विरोधी पक्षातील काही खासदारांनी वेलमध्ये जाऊन डेस्कवर चढत अध्यक्ष्यांच्या आसनाच्या दिशेने नियमपुस्तिका फेकली. तसंच जय जवान जय किसानच्या घोषणा देत सरकारचा जोरदार विरोध केला . यावेळी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या गोंधळानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं. राज्यसभेत मंगळवारी झालेल्या गोंधळावर बोलताना भावूक झालेल्या व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं की, “काल जेव्हा काही सदस्य बाकावर बसले आणि काहीजण वरती चढले तेव्हा या सभागृहाचं पावित्र्य नष्ट करण्यात आलं. विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही”.

Vice President Venkaiah Naidu gets emotional in Rajya Sabha
गुन्हे दाखल असलेल्या आमदार, खासदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका

दरम्यान राज्यसभेत गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर व्यंकय्या नायडू आज कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे. याच मुद्द्यावरकाळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सभागृह नेते पियूष गोयल आणि इतर भाजपा खासदारांनी व्यंकय्या नायडू यांची भेट देखील घेतली होती.काल दुपारी जेवणानंतर विरोधी पक्षाचे नेते काळ्या रंगाचे कपडे घालून सभागृहात पोहोचले होते यावेळी विरोधकांनी सरकार आपला आवाज दाबत असल्याचा आरोप करता सरकार जनतेशी निगडीत प्रश्नांपासून पळ काढत आहे असा आरोप देखील विरोधकांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com