Lockdown Dainik Gomantak
देश

Covid-19: देशात पुन्हा होणार लॉकडाऊन लागू; सरकारने दिली 'ही' मोठी माहिती

Covid-19 PIB Fact Check: देशात आणि जगात पुन्हा कोरोना रुग्णांची वाढू लागली आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा आपले पाय पसरले आहेत.

दैनिक गोमन्तक

Covid-19 PIB Fact Check: देशात आणि जगात पुन्हा कोरोना रुग्णांची वाढू लागली आहे. चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा आपले पाय पसरले आहेत. याचीच खबरदारी घेत चीनसह सहा देशांतून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने कोविडच्या प्रतिबंधासंदर्भात एक अॅडवायजरी जारी केली आहे. या सगळ्यात सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजने धक्काच बसला आहे.

लोकांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची चर्चा

सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलेल्या बातम्यांमध्ये दावा केला जात आहे की, कोविड-19 रोखण्यासाठी देशात 15 दिवसांचा लॉकडाऊन असेल. देशात लॉकडाऊन असेल आणि शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालये 15 दिवस बंद राहतील, असेही या बातमीत सांगण्यात येत आहे. मेसेजमध्ये बातम्या म्हणून टीव्ही स्क्रीनही शेअर करण्यात आली आहे. या मेसेजमुळे लोक पुन्हा लॉकडाऊनची (Lockdown) चर्चा करु लागले आहेत.

दिशाभूल करणारे संदेश फॉरवर्ड न करण्याचे आवाहन

दुसरीकडे, 'पीआयबी फॅक्ट चेक'च्या तथ्य तपासणीच्या आधारे असे सांगण्यात आले की, असे सर्व दावे खोटे आहेत. तसेच कोविडशी संबंधित कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासा, असेही सांगण्यात आले आहे . PIB ने दिशाभूल करणारे मेसेज फॉरवर्ड करण्यापासून सावध केले आहे. 4 जानेवारीच्या संध्याकाळी पीआयबीने हे ट्विट केले आहे.

PIB फॅक्ट चेकमध्ये, देशहितासाठी आवश्यक असलेले लॉकडाऊन पूर्णपणे बनावट असल्याचे सांगण्यात आले आहे. सरकारने अशी कोणतीही माहिती दिलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT