Covid-19: नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी

नेपाळमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने नेपाळने हे पाऊल उचलले आहे.
Covid-19 |Nepal |India
Covid-19 |Nepal |IndiaDainik Gomantak

नेपाळने भारतीय पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. कारण काही भारतीयांना कोरोणाची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर नेपाळने त्यांच्या देशात प्रवेशावर बंदी घातली आहे. चार भारतीय पर्यटकांना कोरोणा (COVID-19) संसर्गाची सकारात्मक चाचणी केल्यानंतर त्यांना भारतात परत पाठवण्यात आले आहे. हिमालयीन देशाने येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने हे पाऊल उचलले आहे. पश्चिम नेपाळमधील बैताडी जिल्ह्यातील झुलाघाट बॉर्डर पॉइंटवरून भारतातील चार पर्यटक नेपाळमध्ये दाखल झाले होते.

बैताडी येथील आरोग्य (Health) कार्यालयाचे माहिती अधिकारी बिपिन लेखक यांनी सांगितले की, चार भारतीय नागरिकांना संसर्ग झाल्याचे आढळून आले असून त्यांना घरी परतण्यास सांगण्यात आले आहे. लेखक म्हणाले, "आम्ही भारतीयांची कोविड -19 चाचणी देखील तीव्र केली आहे." ते म्हणाले की भारतातील (India) अनेक नेपाळी नागरिकांना कोविड -19 ची लागण झाल्याचे आढळले आहे. ते म्हणाले की ज्या भारतीय पर्यटकांना (Tourist) कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यांना देशात येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Covid-19 |Nepal |India
Rishi Sunak यांच्या विजयासाठी ब्रिटनमध्ये होम हवन, जाणून घ्या

बैताडी जिल्ह्यात कोरोना (Corona) विषाणूचा धोका खूप जास्त आहे, कारण त्याची सीमा भारताला लागून आहे.जिल्ह्यात सध्या 31 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात संक्रमितांची संख्या 4,41,74,650 झाली आहे.आकडेवारीनुसार मृतांची संख्या 5,26,772 वर पोहोचली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com