Gujarat Assembly Election: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी होत आहे. त्यासाठी प्रचार मंगळवारी सायंकाळी थांबला. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात 788 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
पुल दुर्घटना झालेल्या मोरबीसह कच्छ, राजकोट, पोरबंदर आणि जूनागड येथे या टप्प्यात मतदान होत आहे. एकूण 19 जिल्ह्यांमधील 2 कोटीहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
पहिल्या टप्प्यातील सर्व जागांवर भाजप आणि काँग्रेस निवडणूक लढवत आहेत. आम आदमी पक्षाने 88 जागांवर उमेदवार उतरवले आहेत. समाजवादी पक्ष 57 तर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने 6 उमेदवारांना तिकिट दिले आहे.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी तीन जिल्ह्यात चार सभा घेतल्या. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भावनगर येथे रोड शो केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मांडवी आणि गांधीधाम येथे प्रचार केला. गेल्या 20 दिवसात भाजपने 160 हून अधिक सभा, रॅली आणि रोड शो केले आहेत.
राज्यात दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी 5 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राज्यात एकुण 4.6 लाख मतदार आहेत. भाजपने विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून समोर केले आहे. तर काँग्रेस आणि आपने मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा उल्लेख केलेला नाही. पण काँग्रेसकडून भरत सोलंकी, अर्जुन मोढवाडिया, शक्तिसिंह गोहिल हे तर आप मध्ये गोपाल इटालिया आणि इशुदान गढवी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.