Air India-Vistara Merger: टाटा सन्स आणि सिंगापुर एअरलाईन्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता विस्तारा एअरलाईन्स एअर इंडिया या कंपनीत विलिनीकरण केले जाणार आहे. मार्च 2024 पर्यंत हा निर्णय अंमलात येणार आहे.
सिंगापुर एअरलाईन्सने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, टाटा सन्स आणि सिंगापुर एअरलाई्सने चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे. मार्च 2024 पर्यंत 'विस्तारा'चे एअर इंडियामध्ये विलिनीकरण करण्याचे लक्ष्य आहे.
विस्तारा एअरलाईन्समध्ये टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाई्सची भागीदारी आहे. यात सिंगापूर एअरलाईन्सची मालकी 51 टक्के तर टाटा सन्सची मालकी 49 टक्के आहे. आता नव्या रचनेनुसार एअर इंडिया हा ब्रँड म्हणून अधिक मोठा होणार असून आता एअरइंडिया अधिक मार्गांवर हवाई वाहतूक करू शकेल. विलिनीकरणानंतर सिंगापुर एअरलाईन्स एअर इंडियात 20 हजार 585 मिलियन रुपये गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीमुळे एअर इंडियात सिंगापूर एअरलाईन्सची मालकी 25 टक्के होईल.
टाटा ग्रुपने केंद्र सरकारच्या निर्गुंतवणुकीकराचा भाग म्हणून याच वर्षाच्या सुरवातीला एअर इंडिया ही सरकारी मालकीची कंपनी 18000 कोटी रूपयात विकत घेतली होती. टाटा ग्रुपकडे सध्या एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशियाचीही मालकी आहे. या दोन कंपन्यांचेही विलिनीकरण मार्च 2024 पर्यंत एअर इंडियात होईल. त्यानंतर या चारही कंपन्या एयर इंडिया या एकाच ब्रँड नेमने काम करतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.