नवी दिल्ली : देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून राहीले आहे. तर हाती आलेल्या एक्झिट पोलच्या निकाला वरून बर्यापैकी भाजपचीच सत्ता येईल असेच चित्र निर्माण झाले आहे. पण एक्झिट पोलचा निकाल हा अंतिम असू शकत नाही. नक्की काय निकाल येईल? कोणाची सत्ता येईल हे 10 तारखेलाच कळणार आहे. असे असताना काँग्रेस नेते दीपेंद्र हुडा यांनी येणाऱ्या निकालावरून बोलताना, पाच राज्यांमध्ये लोकांनी केंद्र सरकारला नाकारलं असेल, तशी खात्री आपल्याला असल्याचे म्हटले आहे. (people have voted against an arrogant central government says Deepender Hooda)
देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूकांत काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) थेट लढत झाल्याचेच चित्र दिसत आहे. तर यावेळी दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत झाल्याने कोण जिंकणार आणि विरोधात बसणार हे जनतेला पहायला मिळेल. तर निवडणूकीत जनतेचा मूड पाहता त्यांनी केंद्र सरकारला (central government) नाकारलं असेल, असे दिसत आहे.
तर उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), मणिपूर (Manipur) आणि गोव्यात (Goa) काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करणार असल्याचेही काँग्रेस नेते दीपेंद्र हुडा यांनी सांगितले. तसेच एक्झिट पोलच्या निकालावरून उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज असेल असे दाखवण्यात आले असले तरिही यूपीमध्ये (UP) सत्ता बदल होईल. आणि त्यात काँग्रेस (Congress) महत्त्वाची भूमिका बजावेल असेही हुडा म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.