Asia Cup Controversy 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवार (28 सप्टेंबर) आशिया कप 2025 चा अंतिम आणि ऐतिहासिक सामना खेळला जाणार आहे. 41 वर्षांच्या आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये पहिल्यांदाच अंतिम सामना होत आहे. मात्र, या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक नवा वाद उकरुन काढला आहे. पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याच्याविरोधात शिस्तभंगाची तक्रार दाखल केली.
एएनआयने समा टीव्हीच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगने कथितरित्या केलेल्या 'अश्लील इशाऱ्यावर' पाकिस्तानने आक्षेप घेतला. पीसीबीने आयसीसीकडे केलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (21 सप्टेंबर) झालेल्या सुपर-4 च्या सामन्यादरम्यान अर्शदीपने हा इशारा केला होता. या डावखुऱ्या गोलंदाजाने आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले, असा दावा पीसीबीने केला. अर्शदीपच्या या कृतीने क्रिकेटची बदनामी झाली असून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केली.
अर्शदीप सिंगविरुद्ध तक्रार करण्यापूर्वीही पीसीबीने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या विरोधात दोन तक्रारी आयसीसीकडे केल्या आहेत. 14 सप्टेंबर (रविवार) रोजी झालेल्या गट-सामन्यानंतर सूर्याने 'पहलगाम घटनेबद्दल केलेल्या विधानावर पीसीबीने आक्षेप घेतला. सूर्यकुमारने या घटनेला राजकीय रंग दिला असल्याचा पीसीबीने दावा केला. यानंतर या प्रकरणात आयसीसीने सूर्यकुमार यादववर मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावला.
एकंदरीत, आशिया कप फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड मैदानाबाहेरही एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. मैदानातील तणावाप्रमाणेच हा राजनैतिक तणावही वाढताना दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.