Turtle Walker: समुद्री कासवांचे अस्तित्व हा केवळ वैज्ञानिक नाही तर तो सामाजिक प्रश्न; ‘टर्टल वॉकर’ माहितीपट

Turtle Walker documentary Goa: समुद्री कासवांची घरटी शोधण्यास, कठीण जागेत शोध घेण्यास आणि फिल्ड डेटा गोळा करण्यास त्याला मदत केली होती.
Turtle Walker documentary Goa
Turtle Walker documentary GoaDainik Gomantak
Published on
Updated on

संवर्धनाचे तत्त्वज्ञान केवळ प्राण्यांचे संरक्षण करण्यापुरते मर्यादित नाही, तर या तत्वज्ञानात समुदायांना सक्रियपणे सहभागी करून घेणे आवश्यक आहे असे  चित्रपट निर्मात्या तायरा मालानी आग्रहपूर्वक सांगतात. त्यांच्या ‘टर्टल वॉकर’ या माहितीपटाचे प्रदर्शन हल्लीच पिळर्ण येथील ‘म्युझियम ऑफ गोवा’ मध्ये झाले. 

जिथे कासवे आपली अंडी घालण्यास येतात, जिथे पर्यटन चालते, जिथे मासेमारी ही उपजीविका असते, जिथे मानवी गर्दी असते, अशा गोव्याच्या नाजूक किनारपट्टीवर समुद्री कासवांचे अस्तित्व हा केवळ वैज्ञानिक प्रश्न नाही तर तो एक सामाजिक प्रश्नही आहे.

आपल्या ‘टर्टल वॉकर’ या माहितीपटातील उदाहरणे वापरून दिग्दर्शिका तायरा यांनी सांगितले, की जीवशास्त्रज्ञ सतीश भास्कर यांनी दीर्घकाळ चालवलेल्या सर्वेक्षणात स्थानिक समुदायातील माणसे केंद्रस्थानी होती. त्यांनी समुद्री कासवांची घरटी शोधण्यास, कठीण जागेत शोध घेण्यास आणि फिल्ड डेटा गोळा करण्यास त्याला मदत केली होती. 

१९७० च्या उत्तरार्धापासून भारताच्या किनारपट्टीवर आणि अंदमान निकोबार बेटांवर भास्कर यांनी समुद्री कासवांच्या घरट्यांचे जे व्यापक सर्वेक्षण केले ते या माहितीपटात दाखवण्यात आले आहे. त्यांच्या त्या कामामुळे पूर्वी ठाऊक नसलेल्या अनेक घरट्यांची ओळख पटली आणि देशात समुद्री कासवांच्या संवर्धनांचा दीर्घकालीन पाया रचला गेला. 

Turtle Walker documentary Goa
Olive Ridley Turtle Morjim: 1 नाही, 2 नाही तब्बल 99 अंडी; गोव्यातील किनाऱ्यावरचा पहा सुंदर Video

अंडी उबून अंड्यांमधून बाहेर आल्यानंतर कासवांची पिल्ले चंद्राच्या प्रकाशाचा वापर करून समुद्रात जातात मात्र रस्त्यावरील दिवे आणि समुद्रकिनाऱ्यावरील कृत्रिम प्रकाशामुळे अनेकदा उबलेल्या अंड्यातील कासवांची पिल्ले जमिनीच्या आत जातात.

त्यामुळे त्यांच्या मृत्यू दरात लक्षणीय वाढ होते. समुद्रकिनाऱ्यावरील मानवी उपस्थिती त्यांच्या वर्तनात अधिकच व्यत्यय आणते. किनाऱ्यावरील गर्दी, गोंगाट आणि दिवसा होणाऱ्या मानवी हालचालींमुळे प्रौढ कासवे किनाऱ्यावर घरटी बांधण्यापासून परावृत्त होतात आणि ती अनेकदा अंडी न घालता समुद्रात परततात.

Turtle Walker documentary Goa
Morjim Turtle Conservation: पर्रीकरांचे स्वप्न वन खात्याच्या दुर्लक्षामुळे अधांतरी! तेमवाडा कासव संवर्धन केंद्राची दुरवस्था; निसर्गप्रेमींमध्ये संताप

किनाऱ्यावरील कचऱ्यामुळे अंड्यातून बाहेर येणाऱ्या पिल्लांना भटक्या कुत्र्यांपासून आणि शिकारीचा धोका असतो. 

समुद्रकिनाऱ्यावर वीण करताना अनेकदा कासवे मासेमारी जाळ्यात अडकतात. मासेमाऱ्यांच्या जाळ्यांपासून सुटून जाण्यास मदत करणारी उपकरणे अस्तित्वात आहेत परंतु, त्यांची अंमलबजावणी भारतात केली जात नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com