Asia Cup 2025 Final: IND vs PAK फायनल सामना फ्री मध्ये पाहा! कुठे पाहता येणार? येथे वाचा सर्व माहिती

India vs Pakistan Final Live Streaming: आशिया कप २०२५ चा महामुकाबला आता काही तासांवर येऊन ठेपला आहे.
India vs Pakistan Final Live Streaming
India vs Pakistan Final Live StreamingDainik Gomantak
Published on
Updated on

India vs Pakistan, Asia Cup 2025 Final

आशिया कप २०२५ चा महामुकाबला आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. रविवारी, २८ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येणार आहेत. आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांची अंतिम फेरीत लढत होणार असल्याने या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

पहिल्यांदाच फायनलमध्ये आमनेसामने

या स्पर्धेच्या १७ व्या आवृत्तीत भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा एकमेकांना भिडतील. यापूर्वी ग्रुप स्टेज आणि सुपर फोर फेरीतील दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले होते. त्यामुळे भारतीय संघावर आत्मविश्वासाचा वार आहे, तर पाकिस्तान अंतिम लढतीत जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

भारत-पाकिस्तानची आशिया कपमधील कामगिरी

आशिया कपच्या मागील १६ स्पर्धांमध्ये भारताने सर्वाधिक ८ विजेतेपदे पटकावली आहेत आणि तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. भारत या वेळी नवव्या विजेतेपदाच्या शोधात आहे. पाकिस्तानने आतापर्यंत फक्त दोनदा आशिया कप जिंकला असून, या वेळी तिसऱ्या विजेतेपदासाठी त्यांची झुंज असेल. भारत हा स्पर्धेचा गतविजेता देखील आहे, त्यामुळे त्यांच्याकडे मानसिक आघाडी आहे.

India vs Pakistan Final Live Streaming
Goa Police: जिल्हा दंडाधिकाऱ्यांना 'NSA' कायदा लागू करण्याचा अधिकार द्या, गोवा पोलिसांचा राज्य सरकारकडे महत्त्वपूर्ण प्रस्ताव

सामन्याची वेळ आणि स्थळ

  • तारीख: रविवार, २८ सप्टेंबर २०२५

  • सामन्याची वेळ: रात्री ८ वाजता (भारतीय वेळेनुसार)

  • टॉस: संध्याकाळी ७:३० वाजता

  • स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, युएई

सामना कुठे पाहू शकता?

  • टीव्हीवर: सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल १, २, ३ आणि ५ वर थेट प्रक्षेपण पाहता येईल.

  • ऑनलाइन स्ट्रीमिंग: सोनी लिव्ह अॅप आणि वेबसाइटवर थेट सामन्याचा आनंद घेता येईल.

मोफत कुठे पाहता येणार?

डीडी स्पोर्ट्स (DD Sports) वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण मोफत पाहता येईल.

India vs Pakistan Final Live Streaming
Goa Tourism: 20 वर्षांपूर्वी असं न्हवतं! आधुनिकतेमागे धावताना गोव्याने पर्यटनातला Essense गमावलाय?

भारत-पाकिस्तानचा सामना म्हटला की केवळ दोन्ही देशातीलच नाही, तर जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधले जाते. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच या दोन संघांमध्ये जेतेपदासाठी अंतिम टक्कर होणार असल्याने हा सामना ऐतिहासिक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com