Air India Express Goa Flight Dainik Gomantak
देश

Air India Express Goa Flight: गोव्याला जाणाऱ्या फ्लाईटमधून प्रवाशाला काढले बाहेर; काय घडले वाचा सविस्तर...

Akshay Nirmale

Air India Goa Flight: गोव्याला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका फ्लाईटमधून एका प्रवाशाला बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. बेंगळूरू विमानतळावरून उड्डाण करण्यापुर्वी विमानातील केबिन क्रूसोबत गैरवर्तन केल्यावरून या प्रवाशावर ही कारवाई करण्यात आली आहे.

एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, “बेंगळुरू ते गोवा या फ्लाइटमध्ये चढत असताना एका प्रवाशाने आमच्या केबिन क्रूसोबत गैरवर्तन केले. त्यानंतर त्याला ताबडतोब बाहेर काढण्यात आले. तसेच बेंगळुरू विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे."

प्रवक्त्याने सांगितले की, “व्यत्यय आणणाऱ्या प्रवाशांबाबत आमचे एक धोरण आहे. त्यात एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अंतर्भूत आहे. एअरलाईनच्या कर्मचाऱ्यांनाही सुलभ प्रवास करता आला पाहिजे. तसे प्रवासी व्यवस्थापन धोरण आहे.

या सर्व नियमांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आम्ही आमच्या अतिथी आणि क्रू यांच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला प्राधान्य देतो. आमच्या उड्डाणांमध्ये व्यत्यय आणणार्‍या वर्तनाबाबत आमचा झीरो टॉलरन्स असा दृष्टिकोन आहे.

काही दिवसांपुर्वीच चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये आप्तकालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न एका प्रवाशाने केला होता. त्यामुळे सहप्रवासी घाबरून गेले होते. बुधवारी पहाटे दिल्ली-चेन्नई विमानात ही घटना उघडकीस आली होती.

मणिकंदन असे त्या प्रवाशाचे नाव होते. विमान चेन्नईला पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांनी त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) ताब्यात दिले होते.

दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेस ही लो कॉस्ट सेवा देणारी विमान कंपनी आहे. केरळमधील कोची येथे या कंपनीचे मुख्यालय आहे. एअर इंडिया चार्टर्सतर्फे ही कंपनी चालवली जाते. या कंपनीकडून विविध 33 ठिकाणी एकूण 649 फ्लाईट्स चालवल्या जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT