Social Media Addiction | Rajasthan News Dainik Gomantak
देश

'...फेसबुक-इन्स्टा अकाउंट केले डिलीट', 13 वर्षाच्या मुलीने काढला घरातून पळ

मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाचे व्यसन मुलांवर इतके वरचढ झाले आहे की, त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात.

दैनिक गोमन्तक

Social Media: मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियाचे व्यसन मुलांवर इतके वरचढ झाले आहे की, त्यासाठी ते काहीही करायला तयार होतायेत. विशेष म्हणजे, त्यांनी अत्यंत धोकादायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमधून अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे एका 13 वर्षाच्या मुलीने घरातून पळ काढला कारण कुटुंबाने फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामवरील (Instagram) सोशल अकाउंट डिलीट केले. दुसऱ्या दिवशी मुलगी अजमेरमध्ये सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर बसमध्ये सापडली. (Rajasthan Jaipur News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवीत शिकणारी मुलगी (Girls) तिच्या पालकांच्या मोबाईलवर सोशल मीडिया अ‍ॅप्स वापर करत होती. घरच्यांनी तिला अनेकदा हे करण्यापासून रोखलं, पण ती मानायला तयार नव्हती. मोबाईलवर जास्त वेळ जात असल्याचे पाहून नाराज पालकांनी फोनवरुन सोशल मीडिया (Social Media) अ‍ॅप्स डिलीट केले. त्यामुळे वैतागून रविवारी रात्री मुलीने घर सोडले.

दुसरीकडे, सोमवारी सकाळी कुटुंबीयांना ती घरात न सापडल्याने वडिलांनी विद्यानगर पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ मुलीच्या शोधासाठी एक पथक तयार केले.

विद्यानगर पोलिस (Police) स्टेशनचे एसएचओ वीरेंद्र कुरील (SHO Virendra Kuril) यांनी सांगितले की, 'मुलीच्या शोधासाठी तीन पथके तैनात करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि सुगावा लागल्यानंतर एक टीम अजमेरला पाठवण्यात आली. इथे ही मुलगी बसमध्ये सापडली.' दुसरीकडे, असेही सांगितले जात आहे की, 'मुलीची सोशल मीडियाच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीशी मैत्री झाली होती आणि त्याला भेटायचे होते. मुलीला घर सोडून त्याच्याकडे जायचे होते.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT