New Delhi Viral Video Dainik Gomantak
देश

'दिल्लीतील लोक सभ्य नाहीत', भारतीय लोकांना नावं ठेवणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला उबेर चालकानं झापलं Video

New Delhi Viral Video: दिल्लीतील एक उबेर चालक कारमध्ये एक महिला व पुरुषाची वाद घालताना दिसत आहे.

Pramod Yadav

दिल्लीतील लोक सभ्य नाहीत, असं वक्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी नागरिक आणि त्याच्या भारतीय गर्लफ्रेन्डला उबेर चालकाने चांगलंच झापलं. संतापलेल्या चालकाने दोघांनाही रात्रीच्या वेळी मध्येच सोडून त्यांना भारतीयांना नावं ठेवण्यावरुन सुनावलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, दिल्लीतील एक उबेर चालक कारमध्ये एक महिला व पुरुषाची वाद घालताना दिसत आहे. दिल्लीतील लोक सभ्य नाहीत अशा प्रकारचे वक्तव्य तुम्ही कसं करु शकता, असा सवाल या चालकाने पाकिस्तानी नागरिकाला केला. यावरुन पाकिस्तानी व्यक्ती आपण असे वक्तव्य न केल्याचे म्हणत आहे. तर, त्याची भारतीय गर्लफ्रेन्ड त्याचे समर्थन करताना दिसत आहे.

उबेर चालक काहीसा संतप्त झाल्याचे दिसत असून, त्याने भारतीय महिलेला देखील भारतीय म्हणून असं बोलणं अपेक्षित नसल्याचे सांगत आहे.

पाकिस्तानी नागरिकांसोबत असणारी महिला त्याचीच बाजू घेतना दिसत आहे. तसेच, दिल्लीतील लोक संधीसाधू आहेत, असे उबेर चालकाला सांगताना व्हिडिओत दिसत आहे. उबेर चालक हा केवळ दिल्लीपुरता मर्यादीत प्रश्न नसून, हिंदुस्थानचा प्रश्न असल्याचे म्हणत आहे.

दोघांशी वाद घालत उबेर चालकांने त्यांना रात्रीच्या वेळस रस्त्याच्या मध्येच सोडून देत चांगलंच सुनावलं. यावेळी महिला उबेर चालकाने रात्री साडे बारा वाजता सोडल्याचे ओरडून सांगताना दिसत आहे. तसेच, हा मोदींचा भारत आहे, असेही ही महिला बोलत आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून, देशाला अशा नागरिकांची गरज आहे, अशी प्रतिक्रिया नेटीझन्स देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT