Jammu and Kashmir Dainik Gomantak
देश

पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न, सुरक्षा यंत्रणांनी दिला अलर्ट

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनी नियंत्रण रेषेवर (एलओसी) दहशतवाद्यांच्या चकमकी आणि घुसखोरीबाबत इशारा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistani Terrorists: जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनी नियंत्रण रेषेवर (एलओसी) दहशतवाद्यांच्या चकमकी आणि घुसखोरीबाबत इशारा दिला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोक्याचे आकलन लक्षात घेता देशातील सर्वात मोठ्या इंटेलिजन्स इनपुट शेअरिंग प्लॅटफॉर्मने सीमा सुरक्षा दल (BSF) आणि लष्कर या दोघांनाही सावध राहण्यास सांगितले आहे.

त्याचवेळी, लष्करांकडून सांगण्यात आले की, नियंत्रण रेषेजवळ अद्याप कोणत्याही प्रकारची घुसखोरी झालेली नाही. तथापि, आकडेवारीवरुन असे दिसून आले आहे की, या प्रदेशात कार्यरत असलेल्या पाकिस्तानी म्हणजेच परदेशी दहशतवाद्यांची संख्या स्थानिक लोकांपेक्षा खूप अधिक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली आहे.

काश्मीरमध्ये 141 दहशतवादी सक्रिय आहेत

जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सक्रिय असलेल्या 141 दहशतवाद्यांपैकी 81 परदेशी आणि 59 स्थानिक असल्याचे सरकारी आकडेवारीवरुन दिसून येते. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत विविध गटांशी संबंधित 125 दहशतवादी (Terrorist) मारले गेल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, यापैकी 34 परदेशी मूळचे होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT