पाकिस्तानी अम्पायरवर आली शूज विकण्याची वेळ, 'क्रिकेटशी माझा काही संबंध नाही'

पाकिस्तानमध्ये क्रिकेटचं बरं चाललं असं दिसत नाहीये.
Asad Rauf
Asad RaufDainik Gomantak

पाकिस्तानमध्ये क्रिकेटचं बरं चाललं असं दिसत नाहीये.170 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केलेले पाकिस्तानी पंच असद रौफ आता फुटवेअरचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करत आहेत. 2000 ते 2013 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायरिंग करणारे रौफ आयसीसीच्या एलिट पॅनेलचाही एक भाग होते. यादरम्यान त्यांनी 49 कसोटी, 98 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामन्यांमध्ये कामगिरी बजावली. यानंतर ते आयपीएलमधील फिक्सिंग प्रकरणात अडकले आणि त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली. इथेच रौफ यांची कारकीर्द संपली.

पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना रौफ म्हणाले, 'आता मी क्रिकेटचे सामने पाहत नाही. आणि त्यामध्ये रसही राहिला नाही. 2013 नंतर मी क्रिकेट पाहणे बंद केले आहे... कारण मी माझे काम सोडले आहे.'

Asad Rauf
पाकिस्तान क्रिकेट संघ जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर

2016 मध्ये बीसीसीआयने बंदी घातली

2013 मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात असद रौफ यांना चौकशी समितीने दोषी ठरवले होते. यानंतर बीसीसीआयने 2016 मध्ये त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घातली होती. सट्टेबाजांकडून महागड्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यावर ते म्हणाले, "या सर्व समस्या येईपर्यंत आयपीएलमध्ये माझी सर्वोत्तम वेळ होती."

Asad Rauf
पाकिस्तान क्रिकेटला 'अच्छे दिन'! हा परदेशी संघ येणार दौऱ्यावर

बलात्काराचे आरोपही झाले

2012 मध्ये मुंबईतील एका मॉडेलने असद रौफवर बलात्काराचा आरोप केला होता. मॉडेलने सांगितले होते की, 'मी रौफसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी मला लग्न करण्याचे वचनही दिले होते. परंतु नंतर रौफ यांनी लग्न करण्यास नकार दिला.' दुसरीकडे मात्र, 10 वर्षांपूर्वी रौफ यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

Asad Rauf
श्रीलंका दौऱ्यावर परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला, तमिळांच्या हक्कांवर करणार चर्चा

आपल्या दुकानाबाबत रौफ म्हणाले की, 'मी स्वत:साठी हे दुकाने चालवत नाही. हे दुकान आपण आपल्या कर्मचाऱ्यांसाठी चालवत आहे. जेणेकरुन त्यांचा उदरनिर्वाह चालेल. मी आणि माझी पत्नी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतो. मला दोन मुले आहेत. एक मुलगा दिव्यांग असून दुसरा मुलगा शिक्षण पूर्ण करुन नुकताच अमेरिकेतून परतला आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com