Pakistan Firing Dainik Gomantak
देश

Pakistan Firing: पाकड्यांच्या कुरापती सुरुच! पूंछ आणि उरीमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून पुन्हा गोळीबार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Poonch Border Firing Update: पूंछमध्ये 11 तासांच्या शांततेनंतर पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा गोळीबार सुरु केला आहे. पूंछ व्यतिरिक्त पाकिस्तानी सैन्याने उरीमध्येही गोळीबार सुरु केला.

Manish Jadhav

पूंछमध्ये 11 तासांच्या शांततेनंतर पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा गोळीबार सुरु केला आहे. पूंछ व्यतिरिक्त पाकिस्तानी सैन्याने उरीमध्येही गोळीबार सुरु केला. एएनाय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरु होताच संपूर्ण खोऱ्यात सायरन वाजू लागले. पूंछमधील दिगवार आणि करमाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्य गोळीबार करत आहे.

पूंछमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार

पाकिस्तान सैन्यकडून पूंछमधील अनेक निवासी भागांना लक्ष्य करण्यात आले असून नागरिकांच्या घरांचे आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 8-9 मे च्या मध्यरात्री पूंछमध्ये बेछूट गोळीबार केला होता. स्थानिक प्रशासनाने सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अलिकडेच, पूंछमधील एका घरातून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

भारताचे चोख प्रत्युत्तर

पूंछ आणि लगतच्या भागात गोळीबार आणि तणावाचे वातावरण असताना सायरनचे आवाज ऐकू आले. परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, पाकिस्तानने (Pakistan) पूंछ, तंगधार, उरी, मेंढर, राजौरी, अखनूर आणि उधमपूर येथे जड शस्त्रे आणि सशस्त्र ड्रोनने हल्ले केले. पाकिस्तानने पूंछमधील एका गुरुद्वारावरही हल्ला केला, ज्याचा भारताने तीव्र निषेध केला. भारतीय लष्करानेही पाकिस्तानच्या या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

सध्याच्या परिस्थितीवर माजी सैनिकांबरोबर पंतप्रधानांची चर्चा

दुसरीकडे, दिल्लीत पुन्हा एकदा हालचाली तीव्र झाल्या आहेत. पाकिस्तानच्या अयशस्वी हल्ल्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (9 मे) देशाच्या सशस्त्र दलातील माजी सैनिकांबरोबर सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत देशाच्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हवाई दल, लष्कर आणि नौदलाच्या माजी प्रमुखांसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी देशाच्या सुरक्षेबाबत, सीमांची परिस्थिती आणि धोरणात्मक बाबींवर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्याचे सांगितले जात आहे. सर्व माजी लष्करी प्रमुखांनी त्यांचे अनुभव शेअर केले आणि सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी धोरणात्मक सूचनाही केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

Viral Video: 'पप्पा पोलीसमध्ये आहेत, गोळी घालेन...', होमवर्क दिल्यावर चिमुकल्याची थेट शिक्षिकेला धमकी; 'लिटिल डॉन'चा व्हिडिओ व्हायरल!

New Mahindra SUV: टोयोटाची झोप उडवणार महिंद्राची नवी पिकअप! स्कॉर्पिओ आणि थारचं जबरदस्त कॉम्बिनेशन

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये जो रुट गाठणार नवा 'माइलस्टोन'! 22 धावा करताच रचणार इतिहास

SCROLL FOR NEXT